नांदेड : पाच महिन्यांत ४० शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र थांबेना : कल्याणकारी योजना ठरताहेत अपयशी
Nanded number of farmers suicide increase 40 case in five months
Nanded number of farmers suicide increase 40 case in five monthsSakal

नांदेड : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना सुरु आहेत. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी सुरुच असल्याचे विदारक वास्तव आहे. जिल्ह्यामध्ये ता. एक जानेवारी ते ता. १८ मे या पाच महिन्याच्या काळात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्या आहेत.

सततची नापिकी, कर्जाचा वाढता बोजा, शेतमालाला भाव मिळाला नसल्याने येणारे सुलतानी संकट, मुला-मुलींचे लग्न आदी कारणांच्या विवंचनेतून ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले आहे. त्यापैकी बरीच आत्महत्या प्रकरणे शासकीय मदतीला पात्र ठरली आहेत तर १३ प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून, २५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. दोन प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत.

शेतीसाठी काढलेले कर्ज, उत्पादन दिसत असले तरी शेतमालाचे न परवडणारे दर, नापिकी व इतर कारणांमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे.

२५ प्रकरणे ठरली पात्र

२०२१ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याची एकुण ११९ प्रकरणे तर एक जानेवारी २०२२ ते आजपर्यंत ४० प्रकरणे घडली आहेत. या ४० पैकी १३ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तर २५ पात्र ठरली आहेत. सर्व पात्र ठरलेल्या कुटूंबांना तातडीने विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

शेतकरी कल्याणकारी योजनांपासून दूरच

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये प्रेरणा प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना तथा जिल्हा प्रशासनाच्या बंद पडलेल्या दिलासा अभियानाव्यतिरिक्त इतरही योजनांचा यात समावेश आहे. असे असतानाही शेतकरी आत्महत्येच्या घटना कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com