esakal | नांदेड - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ, दिवसभरात २६४ पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बुधवारी (ता. ३०) अहवाल प्राप्त झाला. यात २६४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ७०६ वर पोहचली आहे. बुधवारी दिवसभरात नांदेडच्या अशोकनगरातील महिला (वय ६७), हडको पुरुष (वय ६९), बडपुरा पुरुष (वय ६५), नरसी (ता. नायगाव) पुरुष (वय ७२) आणि मुखेडमधील महिला (वय ६५) या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरात आतापर्यंत ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नांदेड - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ, दिवसभरात २६४ पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना आजारातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी त्या प्रमाणात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येतही भर पडत आहेत. बुधवारी (ता. ३०) एक हजार २५४ जणांचा अहवाल प्राप्त झाला त्यापैकी ९७४ निगेटिव्ह तर २६४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्यान, शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत सध्या वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. 

मंगळवारी (ता. २९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबचा बुधवारी (ता. ३०) अहवाल प्राप्त झाला. यात २६४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ७०६ वर पोहचली आहे. बुधवारी दिवसभरात नांदेडच्या अशोकनगरातील महिला (वय ६७), हडको पुरुष (वय ६९), बडपुरा पुरुष (वय ६५), नरसी (ता. नायगाव) पुरुष (वय ७२) आणि मुखेडमधील महिला (वय ६५) या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरात आतापर्यंत ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड : परतीच्या पावसामुळे रानमेवा असलेले सिताफळ बेचव ​

२३८ रुग्ण कोरोनामुक्त 

दहा दिवसाच्या उपचारानंतर बुधवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील नऊ, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील एक, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनधील १४५, बिलोली पाच, हदगाव दोन, मुखेड २१, लोहा १०, धर्माबाद एक, किनवटचा एक, कंधारचे १३, मुदखेडचे नऊ, उमरीतील १० आणि खासगी रुग्णालयातील ११ असे २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

हेही वाचले पाहिजे- दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू

२६४ कोरोनाबाधित आढळुन आले 

बुधवारी नांदेड महापालिका क्षेत्रात १६१, नांदेड ग्रामीणमध्ये आठ, मुदखेडला चार, भोकरला पाच, कंधारला पाच, हिमायतनगरला एक, बिलोलीत १२, किनवटचे दोन, अर्धापूरचे तीन, हदगावचे १४, धर्माबादला ११, लोहा सहा, नायगाव आठ, मुखेडला १५, माहूरचे तीन, हिंगोलीतील दोन, उदगीरचा एक, उमरखेडचा एक, परभणीतील दोन असे २६४ कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण कोरोनाबाधित - १५ हजार ७०६ 
आज बुधवारी पॉझिटिव्ह- २६४ 
एकुण कोरोनामुक्त- ११ हजार ९५३ 
आज बुधवारी कोरोनामुक्त - २३८ 
एकुण मृत्यू- ४०३ 
आज बुधवारी मृत्यू - पाच 
उपचार सुरु - तीन हजार २५५ 
गंभीर रुग्ण - ५६ 
प्रलंबित अहवाल - एक हजार ८०