

Nanded Panvel Express
esakal
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील तीन महत्त्वाच्या रेल्वेसेवांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-पनवेल आणि नांदेड-हडपसर एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये कायमस्वरूपी तीन डब्यांची वाढ करण्यात आली असून, नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) राज्यराणी एक्स्प्रेसचे विद्यमान आयसीएफ डबे बदलून आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये (क्रमांक १७६१४/१७६१३) सध्या १७ एलएचबी डबे आहेत. त्यात एक २ ए, एक ३ ए आणि एक स्लीपर डबा वाढवून संख्या २० करण्यात आली आहे.
सुधारित रचनेत दोन २ ए, सहा ३ ए, सहा स्लीपर, चार सामान्य श्रेणी, एक एसएलआर आणि एक गार्ड तथा दिव्यांगांसाठी राखीव डबा असेल. हा बदल नांदेडहून २२ सप्टेंबर आणि पनवेलहून २३ सप्टेंबरपासून लागू होईल. नांदेड- हडपसर-नांदेड एक्स्प्रेसमध्येही (१७६३०/१७६२९) १७ वरून २० एलएचबी डबे करण्यात येणार आहेत. यात एक २ ए, एक ३ ए आणि एक स्लीपर डबा वाढविण्यात आला आहे. सुधारित रचनेत दोन २ ए, सहा ३ ए, सहा स्लीपर, चार सामान्य, एक एसएलआर आणि एक गार्ड तथा दिव्यांगांसाठी राखीव डबा असेल. नांदेडहून २४ सप्टेंबर आणि हडपसरहून २५ सप्टेंबरपासून हा बदल लागू होईल.
प्रतिफेरी २०४ प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर! नांदेड-पनवेल आणि नांदेड-हडपसर या दोन्ही रेल्वेंमध्ये वाढवण्यात आलेल्या तीन अतिरिक्त डब्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये १ एसी २-टियर (५२ जागा), १ एसी ३-टियर (७२ जागा) आणि १ स्लीपर क्लास (८० जागा) यांचा समावेश आहे. यामुळे एका फेरीसाठी २०४ अतिरिक्त प्रवाशांची तर जाण्या-येण्याच्या एका संपूर्ण फेरीत एकूण ४०८ प्रवाशांची सोय होणार असून, वेटिंग लिस्ट कमी होणार आहे.
राज्यराणी एक्स्प्रेसला एलएचबी डबे नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११/१७६१२) एलएचबी डब्यांसह धावणार आहे. नांदेडहून चार नोव्हेंबर आणि मुंबईहून पाच नोव्हेंबरपासून हा बदल लागू होईल. दोन एलएचबी रेकद्वारे चालणाऱ्या या गाडीची सुधारित रचना १६ डब्यांची असेल. यात एक द्वितीय सामान-सह-दिव्यांगजन डबा, चार सामान्य, पाच स्लीपर, एक एसी चेअर कार, दोन एसी ३-टियर, एक एसी २-टियर, एक फर्स्ट एसी आणि एक सामान-सह-गार्ड डबा असेल. एलएचबी डब्यांमुळे प्रवासातील स्थिरता, सुरक्षितता आणि आरामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.