esakal | Nanded: रब्बीत साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
sakal

बोलून बातमी शोधा

रब्बी पीक 

नांदेड : रब्बीत साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात दुप्पट वाढ अपेक्षीत आहे. लहान - मोठ्या धरणासह भुजल पातळीची यंदा चांगली स्थिती असल्याने कृषी विभागाकडून साडेतीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर हरभरा, पन्नास हजार हेक्टरवर गहू तर तीस हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ४० हजार २२३ हेक्टर आहे. यात मागील काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा मुबलक आहे. तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

मागील वर्षी जिल्ह्यात तीन लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा यात वाढ होवून रब्बी हंगामात साडेतीन लाख ४८ हजार ८१५ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर गहू ४७ हजार ९२१ हेक्टर, रब्बी ज्वारी ३० हजार ९२२ हेक्टर, मका पाच हजार ९०८ हेक्टर, करडई १४ हजार २७७ हेक्टर, रब्बी तीळ ९११ हेक्टर असे एकूण तीन लाख ५० हजार ७७० हेक्टरवर पेरणी प्रस्तावीत केली आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. खरीपातील शिल्लक खत तसेच मंजूर होणाऱ्या आवंटनामुळे खताची कमतरता पडणार नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

आगामी रब्बीसाठी प्रस्तावीत क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र

हरभरा २,२९,५५३ २,४८,८१५

गहू ४०,२६३ ४७,९२१

रब्बी ज्वारी ३२,१७५ ३०,९२२

रब्बी मका ४,३०३ १,५०७

करडई ३,६२८ १४,२७७

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तसेच जिल्ह्यानजीकच्या प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे तसेच खताचे नियोजन केले आहे.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

loading image
go to top