नांदेड : व्यापाऱ्याकडून ९९ लाखांची खंडणी उकळली, दोघे जेरबंद

भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Nanded Ransom case of 99 lakh from trader two arrested
Nanded Ransom case of 99 lakh from trader two arrestedsakal

नांदेड : शहरातील एका व्यापाऱ्याकडून ९९ लाखाची खंडणी उकळल्याचा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणातील दोन खंडणीखोरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

शहरातील एका व्यापाऱ्याने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात म्हटले की मी स्वतःच्या नावावर महापालिका हद्दीमध्ये प्लाॅट खरेदी केला होता. तो प्लाॅट नगर भूमापन व महापालिका कार्यालयात माझ्या नावे परिवर्तन करून प्लाॅटभोवती तारेचे कुंपन आणि सिमेंटचे खांब लावले होते. दरम्यान आरोपी ओमसिंह दयालसिंह ठाकूर व त्याचे दोन साथीदार यांनी २०१९ मध्ये बनावट सौदाचिठ्ठीचा आधार घेऊन माझ्या प्लॉटवर सुरु असलेल्या प्लॉटवर अडथळा निर्माण करून दहशत निर्माण केली. तसेच माझ्याकडून आरोपींनी ९९ लाख रुपयांची खंडणी वसुल केली आहे.

या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलिस ठाण्याच गुन्हा नोंद करण्यात आला होता. खंडणी प्रकरणातील आरोपी रविंद्रसिंघ लक्ष्मणसिंघ जंगी (रा. शहीदपुरा नांदेड) व ओमसिंह दयालसिंह ठाकूर (रा. जुना मोंढा) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक माणिक बेंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलिस उपनिरीक्षरक श्री, गोटके आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com