esakal | नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शारीरिक संबंध ठेवले आणि ऐनवेळी लग्न करण्यास नकार देणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणांच्या विरोधात गुरुवारी (ता. आठ) कुंटुर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि ऐनवेळी लग्न करण्यास नकार देणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणांच्या विरोधात गुरुवारी (ता. आठ) कुंटुर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच धुम ठोकलेल्या आरोपीला पोलिसांनी मुखेड तालुक्यातून अटक केली आहे. 

नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील निशांत सुधाकर आईलवार या तरुणाने गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे सुत जुळविले. प्रेमाचे सुत जुळतांना तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. प्रेम करुन लग्नाचे आमिष दाखवल्यानंतर मुलगा मुलीच्या घरी वारंवार जात होता.

हेही वाचा पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये ५४ जणांची चौकशी, गुन्हेगार सैरभर

निशांत आईलवारविरुद्ध गुन्हा दाखल

या दरम्यान मुलीच्या नकारानंतरही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवले. पण ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पिडीत मुलीने गुरुवारी (ता. आठ) आॅक्टोबर रोजी कुंटुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी तात्काळ या प्रकरणात पिडीत मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर निशांत आईलवारविरुद्ध गुन्हा दाखल केला.

येथे क्लिक करानांदेड : विजय कबाडेंची जिल्ह्यात दुसरी इनिंग सुरु -

आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी

आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची चाहूल लागताच निशांत आईलवार याने गावातून धुम ठोकली. पण तातडीने एपीआय करीम पठाण यांनी तपासाची चक्रे फिरवून स्वत: आपल्या पथकासह त्याच्या मागावर निघाले. मुखेड तालुक्यातील जांभळी येथून शुक्रवार (ता. नऊ) रोजी अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपीसनायगाव न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने निशांत आईलवार याला दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविल्याची माहिती तपासिक अंमलदार एपीआय पठाण यांनी दिली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे