नांदेडला गुरुवारी २४ कोरोनाबाधितांची भर; २६ जण कोरोनामुक्त 

शिवचरण वावळे
Thursday, 21 January 2021

गुरुवारी ९३६ अहवालापैकी ९१० अहवाल निगेटिव्ह तर २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २२ हजार १८४ एवढी झाली असून यातील २१ हजार १७५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी होत असून, गुरुवारी (ता. २१) कोरोना अहवालानुसार २४ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या २६ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गुरुवारी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 

गुरुवारी ९३६ अहवालापैकी ९१० अहवाल निगेटिव्ह तर २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २२ हजार १८४ एवढी झाली असून यातील २१ हजार १७५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३२६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील नऊ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५८० व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

हेही वाचा- नांदेडला विद्युतदाहिनी, खतनिर्मिती प्रकल्पाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी ​

घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये विष्णुपुरी शासकीय रुग्णालय चार, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १४, जिल्हा रुग्णालय एक, देगलूर दोन व खासगी रुग्णालय पाच असे एकूण २६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात १६, हदगाव एक, नांदेड ग्रामीण एक, माहूर एक, किनवट एक, परभणी दोन, हिंगोली दोन असे एकुण २४ बाधित आढळले.
 
हेही वाचा- नांदेडमध्ये संतापजनक घटना : सालगड्याने अत्याचार करुन केला बालिकेचा खून ​

तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५३  रुग्ण

जिल्ह्यात ३२६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १७, जिल्हा रुग्णालय १६, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) २५, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरण १५०, मुखेड १६, महसूल कोविड केअर सेंटर ११, किनवट चार, देगलूर सहा, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५३ व खासगी रुग्णालय २८ आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह ः २२ हजार १८४ 
एकूण बरे ः २१ हजार १७५ 
एकुण मृत्यू ः ५८० 
गुरूवारी पॉझिटिव्ह - २४ 
गुरूवारी बरे - २६ 
गुरूवारी मृत्यू - शुन्य 
आज प्रलंबित स्वॅब - ३९६ 
सध्या उपचार सुरू -३२६ 
अतिगंभीर प्रकृती - नऊ  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded to receive 24 coronet victims on Thursday 26 corona free Nanded News