esakal | नांदेडला शुक्रवारी २१५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्हाभरात आरटीपीसीआर आणि अँन्टीजन टेस्ट किटद्वारे कोरोनाची तपासणी केली जात आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या दोन्ही प्रकारच्या तपासणीत २१५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नांदेडला शुक्रवारी २१५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः तपासणीसाठी गुरुवारी (ता.२७) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.२८) एक हजार ११४ अहवाल प्राप्त झाले. यात ८४६ निगेटिव्ह, २१५ अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, १६८ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. या अहवालातील एकूण रुग्णांपैकी १११ रुग्ण एकट्या नांदेड शहरातील आहेत. त्यामुळे नांदेडकरांना अजूनही दिलासा नाही असेच दिसून येत आहे. 

जिल्हाभरात आरटीपीसीआर आणि अँन्टीजन टेस्ट किटद्वारे कोरोनाची तपासणी केली जात आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या दोन्ही प्रकारच्या तपासणीत २१५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ८५५ इतकी झाली आहे. पानभोसी रोड कंधार येथील पुरुष (वय ४२), हनगुंदा तालुका बिलोली महिला (वय ४५), कुरुळा तालुका कंधार पुरुष (वय ४०), वासरी पुरुष (वय ४९) व लोकमित्रनगर नांदेड येथील पुरुष (वय ८८) या पाच बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोन रुग्णावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात एक आणि दोघावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आतापर्यंत २११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- चौदा वर्षानंतर जिल्ह्यातून चिकनगुनिया हद्दपार! आरोग्य यंत्रणेचा अहवाल; रुग्णांचे प्रमाण झाले कमी​

शुक्रवारी १६८ रुग्ण कोरोना मुक्त 

दहा दिवसाच्या उपचारानंतर शासकीय रुग्णालयातील -१२, जिल्हा रुग्णालयातील - सात, पंजाब भवन कोविड सेंटर मधील - ७०, देगलुर- १४, बिलोली- १५, किनवट- सात, नायगाव- पाच, धर्माबाद- पाच, लोहा-सात, माहूर-एक, मुदखेड-तीन, मुखेड- ११, कंधार-पाच व कासगी रुग्णालयातील सहा असे एकूण १६८ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत चार हजार ६२ रुग्ण घरी परतले आहेत. 

हेही वाचा- नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी- पालकमंत्री अशोक चव्हाण ​

आरटीपीसीआर तपासणीद्वारे आढळलेले रूग्ण 

शुक्रवारी आरटीपीसीआर तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात- १८, अर्धापूर - तीन, हदगाव - चार, लोहा -दोन, नायगाव - तीन, परभणी -एक, नांदेड ग्रामीण - एक, बिलोली -एक, देगलूर- तीन, मुखेड-आठ, धर्माबाद -सहा, हिंगोली -एक असे एकूण ५१ तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र- ९३, भोकर -एक, बिलोली -१२, देगलूर -सहा, किनवट-दोन, कंधार - नऊ, उमरी -एक, नायगाव -दोन, नांदेड ग्रामीण -सात, मुदखेड-चार, हदगाव-तीन, लोहा-एक, माहूर- एक, मुखेड-१२, धर्माबाद - नऊ, परभणी -एक असे एकुण १६४ बाधित आढळले.