esakal | नांदेड : माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवात धार्मिक पाठ, कथा व कीर्तन! 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड शहराजवळच असलेल्या मुगट परिसरातील ऐतहासिक गुरुद्वारा, माता साहेबदेवाजी यांचा 339 वां जन्मोत्सव सोहळा ! धार्मिक पाठ, कथा व कीर्तन!

नांदेड : माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवात धार्मिक पाठ, कथा व कीर्तन! 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराजवळच असलेल्या मुगट (ता. मुदखेड) परिसरातील ऐतहासिक गुरुद्वारा, माता साहेब देवाजी येथे सोमवारी (ता. २६) ऑक्टोबर रोजी माता साहेबदेवाजी यांच्या 339 व्या जन्मोत्सवास सुरुवात झाली. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमामुळे हा परिसर भक्तीमय झाला असून देशातील अनेक राज्यातील शिख भाविक दाखल झाले आहेत.

पवित्र पावन अशा जन्मोत्सव सोहळ्याचे उद्धघाटन सोमवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता दरम्यान गुरुद्वारा तख्त सचखंड साहेबचे मीत ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगरसाहेबचे मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि गुरुद्वारा माता साहेबचे जत्थेदार संतबाबा तेजसिंघजी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. 

हेही वाचा  फत्तेपूरची शाळा पाहून भारावले नांदेड दक्षिणचे आमदार -

पाठाचा समारोप बुधवारी (ता. २८) ऑक्टोबर 

गुरुद्वारा माता साहेबचे माजी जत्थेदार व शिरोमणी पंथ अकाली बूढा दल ९६ करोडी संतबाबा प्रेमसिंघजी सचखंडवासी यांच्या द्वारे स्थापित परंपरेनुसार आणि प्रेरणेनुसार या जन्मोत्सवास समर्पित श्री अखण्डपाठ साहबाचे प्रारंभ करण्यात आले. भक्तिभावाने पाठ पठन करण्यात आले. वरील पाठाचा समारोप बुधवारी (ता. २८) ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. सोमवारी सकाळी धार्मिक दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. भाई जगतेश्वर सिंघजी पटीयालावाले रागी जत्था यांचे कीर्तन झाले. पश्च्यात भाई जीवनसिंघजी व भाई सुखदेवसिंघजी लुधियानावाले रागी जत्था यांनी शब्दकीर्तन सादर केले. 

येथे क्लिक कराहल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

भाविकांसाठी लंगर प्रसाद

या जन्मोत्सव सोहळ्यास सुप्रसिद्ध रागी, कथाकार, कीर्तनकार आणि धार्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंची उपस्थिती राहणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता पाळण्यात येत आहे. माता साहेब परिसरात वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बाबा तेजसिंघजी यांनी सर्वांना आवाहन केले आहे. या निमित्त भाविकांसाठी लंगर प्रसाद, चहा व ब्रेड पकोडे लंगर सुरु करण्यात आले आहे. बाबा लालसिंघजी आणि गुरुद्वारा लंगर साहेबचे सेवादार लंगर सेवेत सहभागी झाले आहेत. मुदखेड पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त मातासाहेब परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

loading image