नांदेड : माहूरगड विकासाला सर्वांच्या समन्वयातून चालना देऊ

पालकमंत्री अशोक चव्हाण; जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक
Nanded Review meeting regarding Mahurgad development works
Nanded Review meeting regarding Mahurgad development workssakal

नांदेड : श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी २०१० मध्ये ७९ कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिली आहे. यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंर्तभाव केला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या कामांना चालना देण्याच्या दृष्टीने लवकरच मंत्रालय पातळीवर एक विशेष बैठक संबंधित विभाग प्रमुख व मंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन, याला चालना देऊ, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे आदी अधिकारी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र माहूरगड विकासाच्या ७९ कोटीच्या मूळ आराखड्यास २०१० मध्ये मंजूरी देण्यात आली. ही कामे निधीच्या उपलब्धतेप्रमाणे केली जात आहेत. यातील माहूर टी पॉईट ते रेणुकामाता मंदिर, दत्तशिखर पायथा पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सौरपथदिवे, रेणुकामाता मंदिरासाठी आणि दत्त शिखर मंदीरासाठी एक्सप्रेस फिडर, देवस्थानासाठी पाणीपुरवठा योजना अशी कामे पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली. बाकी इतर विभागाची कामे प्रलंबित आहेत. ही कामे युद्धपातळीवर हाती घेण्यासाठी संबंधित विभागाचा निधी उपलब्ध करून घेण्यावर भर देऊ असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. २०१० चा मंजूर आराखडा व त्याची किंमत लक्षात घेता २०१७ मध्ये या आराखड्याबाबत पुर्नपडताळणी करून इतर कामांसह २१६ कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला. याचे नियोजन लवकरच केले जाईल, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पुलाची कामे तत्काळ पूर्ण करा

ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे वेगात सुरू आहेत. त्याचबरोबर ज्या तालुक्यांमधून रेल्वे जाते त्या-त्या ठिकाणी ग्रामीण भागाच्या वाहतूकीसाठी हे मार्ग तत्काळ पावसाळ्याच्या आधी सुरू झाले पाहिजेत. यासाठी संबंधीत विभागाच्या प्रमुखांनी दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. यावेळी भोकर, अर्धापूर, मुगट व इतर तालुक्यातील विकासकामाबाबत आढावा घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com