Nanded roller skating play ground rain water
Nanded roller skating play ground rain watersakal

रोलर स्केटिंग मैदानात साचले पाणीच पाणी

खेळाडूंची होतेय तारांबळ : जिल्हा प्रशासनाचे मात्र होतेय दुर्लक्ष

नांदेड : रोलर स्केटींग रिंगचे कंम्पाऊड वॉल तुटल्यामुळे मैदानामध्ये पाणीच पाणी साचलेले असल्याने युवा खेळाडूंचा हिरमोड होत आहे. मात्र, याचे जिल्हा प्रशासनाला काहीच गांभीर्य नसल्याचे वास्तव रविवारी बघायला मिळाले.

जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या रोलर स्केटींग रिंगचे कंम्पाऊंड वॉल तुटल्यामुळे ग्राउंडमध्ये शनिवारी रात्री पडलेल्या पावसाचे पाणी जमा झाले आहे. परिणामी सकाळी मैदानात आलेल्या युवा खेळाडूंना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले. हिरमोडही झाला. पालकांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाला अनेकदा पत्र देऊन सुद्धा काम होत नाही आहे.

जिल्हा क्रीडा संकुल येथील असलेल्या रोलर स्केटींग रिंगचे ग्राऊंड हे शालेय मुले - मुलींसाठी अतिशय निकृष्ठ दर्जाचे झालेले असून त्यांना निट खेळता येत नाही व सराव सुध्दा करता येत नाही. सदर मैदानामध्ये जागो जागी मोठ - मोठ्या भेगा पडलेले आहेत. तसेच ग्राऊंडच्या चोहो बाजुंनी कंम्पाऊंड वॉल बरोबर नसल्यामुळे पावसाळ्यात या ग्राऊंडमध्ये पाणी साचत असून डबके साचत असल्याने खेळाडूंना अडचणी निर्माण होत आहेत.

या ग्राऊंड व्यतिरिक्त इतर दुसरे कोणतेही ग्राऊंड शालेय मुला - मुलींना खेळण्यासाठी उपलब्ध नाही. हे एकमेव मैदान असूनही रोलर स्केटींग रिंग मैदान पुर्णतः नासधुस व जागोजागी मोठ - मोठे खड्डे पडले असल्यामुळे मैदानाचे अत्यंत नुकसान झालेले आहे. शालेय मुला - मुलींनी खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादीत केलेली आहेत. शालेय मुला- मुलींनी रोलर स्केटींग खेळात देश व विदेशात जाऊन त्यांनी आपले व आपल्या भारत देशाचे परिणामी नांदेड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com