नांदेडला ‘फाईव्ह स्‍टार कार्यालय, सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राबवणार - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

अभय कुळकजाईकर
Saturday, 16 January 2021

नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयाच्या स्तरावर हा उपक्रम अभियान स्वरुपात राबवावा.  या उपक्रमात कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक बाबी यांचा समावेश राहणार आहे. या अभियानात सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वीरित्या राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

नांदेड - जिल्ह्यातील सर्व अधिनस्त शासकीय कार्यालयांनी ता. एक जानेवारी २०२१ ते ता. २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ‘फाईव्ह स्‍टार कार्यालय, सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम अभियान स्वरुपात राबवावा व त्याबाबतचा अहवाल, प्रस्ताव गुणांकासह परिपत्रकात नमूद केलेल्या सूचनानुसार वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयाच्या स्तरावर हा उपक्रम अभियान स्वरुपात राबवावा.  या उपक्रमात कार्यालयीन स्वच्छता, प्रशासकीय बाबी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक बाबी यांचा समावेश राहणार आहे. सर्व संबंधित विभागप्रमुख, कार्यासन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वीरित्या राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

दोन टप्यात अहवाल सादर करावा
या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा पहिला प्रगती अहवाल ता. ३१ जानेवारी व दुसरा प्रगती अहवाल ता. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी dygennanded@gmail.com या ई-मेल आयडीवर जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ता. एक मार्च २०२१ रोजी तहसील कार्यालयाने केलेल्या कामांचा प्रस्ताव गुणांकासह जिल्हाधिकारी कार्यालयास व जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख व उपविभागीय कार्यालयांनी जिल्हास्तरावरील समितीस प्रस्ताव गुणांकासह सादर करावा.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

कार्यालयांचे मुल्यांकन होणार
जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या तहसील कार्यालयाचा क्रमांक निवडण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गुण असणारे कार्यालये ज्या तालुक्यात आहेत त्या तालुक्यांना जिल्हास्तरावरुन प्रथम क्रमांक देण्यात येईल. जिल्हास्तरावरील पथकामार्फत तालुकाच्या कार्यालयांनी केलेल्या कामांची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्यामार्फत मुल्यांकन करण्यात येईल. जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमांकानुसार तहसील कार्यालयाचे प्रस्ताव व जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येईल.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

जिल्हास्तरावर समिती गठीत 
उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामांचे मुल्यांकन करुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवडण्यात येतील. प्राप्त प्रस्तावाची छाननी व कामांचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीमार्फत कार्यालय निहाय मुल्यांकन करुन व प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या परिपत्रकात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded to run 'Five Star Office, Beautiful My Office' project - Collector Dr. Vipin nanded office news