नांदेड : सैनिक गोरठकर यांच्यासह पोलिसदलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना पदक

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

पोलिस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती यांचे पोलिस पदक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना देण्यात आले.

नांदेड : सीमा सुरक्षाबलाचे सेवारत सैनिक कॉ. भास्कर गंगाधर गोरठकर यांचे ऑपरेशन रक्षक जम्मु काश्मिरमध्ये अंतकवाद्याशी झालेल्या चकमकीत 50 टक्के दिव्यांगत्व प्राप्त झाले. त्यांचा आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तांब्रपट देवून गौरव करण्यात आला. पोलिस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती यांचे पोलिस पदक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना देण्यात आले. याचबरोबर पोलिस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, यांना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावल्याबद्दल विशेष सेवापदक देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे, व्यंकट गंगलवाड, शिवकुमार बाचावाड, गोपाळ इंद्राळे, दिगांबर पाटील, आनंद बिच्चेवार, पो. कॉ. अमोल जाधव यांना विशेष सेवापदक देण्यात आले. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह, पो. कॉ. संतोष सोनसळे, साईनाथ सोनसळे यांना सायकलिंग व कोरोना योद्धा प्रशिस्तीपत्र प्रदान करण्यात आले.   

याचबरोबर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकिय आणि खाजगी रुग्णालय यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. यात उषा सुर्यवंशी, प्राची गजभारे, मुक्ता नारायण पवार या विद्यार्थींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार मिळविले. याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील राज्यगुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

समाजात कोरोनाबाबत जनजागृती, आरोग्यविषयक साक्षरता प्रसार व्हावा यादृष्टिने दक्ष असलेल्या माध्यमातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या माध्यम प्रतिनिधी, संपादक, छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्यासमवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. त्यांच्या सोबतीला राखीव पोलिस निरीक्षक शहादेव पोकळे होते. संचलनात सहभागी प्लाटूनचे पथक पुढीप्रमाणे होते. केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) नांदेड, दंगानियंत्रण पथक पोलिस मुख्यालय नांदेड, पोलिस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, महिला पोलिस कर्मचारी पथक, नांदेड शहर विभाग, इतवार उपविभाग पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक (एमएसएफ), पोलिस बँड पथक पो. मु. नांदेड, डॉग स्कॉड युनिट डॉगचे नाव सुलतान, बॉम्ब शोधक व नाशक पथक बीडीडीएस, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर अग्निशमक दल, देवदूत वाहन (मिनी रेस्क्यु फायर टेंडर), अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन, वनविभागचा चित्ररथ, 108 रुग्णवाहिका, पिकेल ते विकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान रेशीम लागवड मिशन 2000 व शेततळ्याली मत्स्यपालन अभियान चित्ररथ, बेटी बचाओ बेटी पढाओ चित्ररथाचा या संचलनात सहभाग होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Sainik Gorathkar and other police officers and employees were awarded medals nanded news