नांदेड : ‘घुमानवारी’ यंदा रेल्वेने

तयारी सुरू, नानक साई फाउंडेशनचा पुढाकार
Nanded Saint Namdev maharaj Nanaksai Foundation ghumanwari
Nanded Saint Namdev maharaj Nanaksai Foundation ghumanwarisakal

नांदेड : दोन राज्यांत बंधुभाव निर्माण करत सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी संत नामदेव महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत नानक-साई फाउंडेशनची घुमानवारी यंदा विमाना ऐवजी रेल्वेने होणार आहे. दोन ते१२ नोव्हेंबर या कालावधीत ही यात्रा होणार आहे.

यंदाचे संत नामदेव यांचे ७५२ वे जन्मशताब्दी वर्ष आहे. नानकसाई फाउंडेशनच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून भाविक यात सहभागी होणार आहेत. संत नामदेव यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आठ वर्षांपासून ही यात्रा काढली जाते. गत वर्षी हवाई मार्गाने यात्रा घुमानला गेली होती. यावेळी ही यात्रा नांदेड-अमृतसर विशेष एक्स्प्रेसने जाणार असल्याचे फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.

धार्मिक आणि सामाजिकतेचे मिलन असलेल्या या यात्रेला यावेळी संत नामदेव महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ असल्याने घुमानवारीला वेगळे, ऐतिहासिक महत्त्व असणार आहे. पंजाब सरकार आणि घुमानच्या नामदेव दरबार कमिटीच्या वतीने उत्सवाची तयारी सुरू आहे.

विविध स्थळांना भेटी

यात्रेच्या निमित्ताने पंजाबसह उत्तर भारतातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातात. संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी ''तीर्थक्षेत्र घुमान'', अमृतसरचे सुवर्णमंदिर, शक्तिपीठ ''माता नैनादेवी'', शक्तिपीठ माता ज्वाला देवी (हिमाचल प्रदेश), आनंदपूरसाहिब'' (तख्त) - कुरुक्षेत्र, पानिपत, नवी दिल्ली, आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य ''भाकरा नांगल'' धरण-पंजाबच्या संस्कृतीचा आँखो देखा इतिहास असलेले ''विरास्ते खालसा म्युझियम'', परजिया कलान- ''कार्तिकी स्वामी''-वाघा ''अटारी'' बॉर्डर- ''माता दुर्गा'' मंदिर अमृतसर- जालियनवाला बाग- फतेगड साहिब, बस्सी पाठणा असे भ्रमण व दर्शन घडवते. यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बोकारे आणि यात्रा संयोजन समितीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com