Nanded : परवान्याविनाच खाद्यपदार्थांची विक्री; स्वच्छतेचे निकष धाब्यावर, आजाराला आमंत्रण!

नांदेड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.
Nanded
NandedSakal

नांदेड - शहरातील विविध भागातील हाॅटेलसह रस्त्यांवर विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर उघडे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून अन्न व औषध विभागासह महापालिका आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nanded
Nanded Crime : दोन गावठी पिस्टलसह सहा काडतूस जप्त; दोन आरोपींना अटक

नांदेड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याबरोबरच व्यावसायीक प्रतिष्ठानांचीही संख्या वाढत आहे. शहरात छोटी हाॅटेल, भेल भंडार, शीतपेयाच्या गाड्यांसह पाणीपुरी, वडापाव, चायनीज विक्री करणाऱ्या हातगाड्यांनी सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमित केले आहेत.

मुख्य रस्त्यावर व चौकाचौकात सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या संख्येने थाटली जातात. मात्र, यातील बहुतांश हाॅटेल्स व गाड्यांवर परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Nanded
Mumbai : डोंबिवलीत स्वच्छ सर्वेक्षणाची पोलखोल; व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल

अनेकांनी परवाना नुतनीकरण न करताच हा व्यवसाय सुरु ठेवला असल्याचेही आढळून आले आहे. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र, या भानगडीत रस्त्यावर खाद्यविक्री करणारे पडताना दिसत नाहीत. त्यातच आता पावसाळा सुरू झाला असून रोगराई पसरण्याची भीती आहेच.

Nanded
INDIA Mumbai Meeting: मुंबईतील बैठकीपूर्वीच 'इंडिया' आघाडीत बिघाडी? आप-काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

परवाना नुतनीकरणाकडे दुर्लक्ष

छोट्या हाॅटेलमधून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, अशा हाॅटेल्समध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते की नाही, हे तपासून संबंधितांकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून काही अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवाना दिला जातो.

एवढे सर्व करूनही खाद्य परवानाही या पदार्थ विक्री धारकांना घ्यावा लागतो. हे परवाने दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागतात. मात्र, शहरातील अनेक छोटे हाॅटेल्स धारकांनी परवाना नूतनीकरण केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com