esakal | नांदेड -  सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट, रविवारी २७५ रुग्ण कोरोनामुक्त, १८२ जणांचा आहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी (ता. २७) ८७९ आहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर रविवारी २७५ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला

नांदेड -  सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट, रविवारी २७५ रुग्ण कोरोनामुक्त, १८२ जणांचा आहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात आॅगस्ट महिण्यांपासून कोरोनाबाधीत रुग्ण आणि मृत्यूदरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. परंतु मागील दोन दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होऊन कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हा प्रशासन व नांदेडकरांसाठी दिलासादायक चित्र आहे. 

शनिवारी (ता.२६) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता. २७) ८७९ आहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर रविवारी २७५ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ॲन्टीजन टेस्ट किट व आरटीपीसीआर द्वारे घेण्यात आलेल्या चाचणीत १८२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ७२ इतकी झाली आहे.

 हेही वाचा- नांदेड - लॉकडाउननंतर ‘कोरोना’चा खासगी ‘डोस’ सोसेना ​

६२ रुग्णांची प्रकृती गंभीर 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय परिसर पुरुष (वय ६०), चैतन्यनगर नांदेड पुरुष (वय ५६), विणकर कॉलनी नांदेड पुरुष (वय ६२) आणि पाळज ता.भोकर येथील एक पुरुष (वय ६०) अशा चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा रुग्णालय- २३, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- १९, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरटाईन मध्ये उपचार सुरु असलेले - ११५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ११ हजार २२७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या तीन हजार ३८२ बाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्यापैकी ६२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचा- नांदेड - कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील शेतीची पाहणी, नुकसानीचे पंचनामे करुन राज्य- केंद्र सरकारला अहवाल पाठविणार ​

या भागात आढळुन आले कोरोना रुग्ण

रविवारी नांदेड महापालिका क्षेत्रातील - ९८, नांदेड ग्रामीण- चार, लोहा- सात, किनवट- १२, कंधार- १०, नायगाव- नऊ, भोकर- तीन, हदगाव- चार, धर्माबाद- पाच, माहूर- तीन, उमरी- पाच, मुखेड- ११, मुदखेड- दोन, लातूर- एक, हिंगोली- पाच व परभणी- तीन असे २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

कोरोना मीटर 

रविवारी पॉझिटिव्ह-१८२ 
रविवारी कोरनामुक्त- २७५ 
रविवारी मृत्यू- चार 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १५ हजार ७२ 
एकूण कोरोनामुक्त- ११ हजार २२७ 
एकूण मृत्यू-३९० 
उपचार सुरु- तीन हजार ३८२ 
गंभीर रुग्ण- ६२ 
प्रलंबित अहवाल- एक हजार ७२६

loading image