Nanded: प्रभाग १३ ‘अ’साठी पोटनिवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

नांदेड : प्रभाग १३ ‘अ’साठी पोटनिवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड, ता. २४ (बातमीदार) ः नांदेड वाघाळा महापालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. राज्यात नांदेडसह धुळे, अहमदनगर आणि सांगली - मिरज - कुपवाड या महापालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ता. २१ डिसेंबर रोजी मतदान तर ता. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी दिली. नांदेडमध्ये सदस्याच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे.

या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आज बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे ता. २९ नोव्हेंबर ते ता. सहा डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. ता. पाच डिसेंबर रोजी शासकीय सुटीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ता. सात डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ता. नऊ डिसेंबरपर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ता. दहा डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. ता. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ता. २२ डिसेंबर रोजी होईल.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

प्रभागात तीन हजार ४५४ मतदार

नांदेड वाघाळा महापालिकेत प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ हा अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी होता. त्या ठिकाणी गंगाबाई सोनकांबळे या कॉँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांचे ता. २५ जानेवारी २०१९ मध्ये निधन झाले. त्यानंतर दोनदा पोटनिवडणुकीचा विषय झाला पण कोरोना संसर्गामुळे निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही पोटनिवडणुक होत आहे. या प्रभागात २७ मतदार केंद्र असून तीन हजार ४५४ मतदार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणुक विभागाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

loading image
go to top