esakal | नांदेड - अंत्यविधीसाठी शांतीधामला मिळाला आधार, फाउंडेशनचा मदतीचा हात; शंभर बेवारस - कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधासाठी जैव इंधन पुरवणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

मागील १७ वर्षापासून ना नफा ना तोटा या तत्वार शांतीधाम सेवा भावी संस्थेच्या वतीने गोवर्धन घाट स्मशान भूमित अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य, लाकुड, कपडा, शवपेटी अशा अनेक सेवा दिल्या जात आहेत.

नांदेड - अंत्यविधीसाठी शांतीधामला मिळाला आधार, फाउंडेशनचा मदतीचा हात; शंभर बेवारस - कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यविधासाठी जैव इंधन पुरवणार 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मागील सहा महिन्यांपासून लॉकडाउन होते. यादरम्यान अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शांतिधाम सेवाभावी संस्थेची चिंता वाढली होती. गोवर्धन घाट स्मशानभूमीत येणाऱ्या अनाथ व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाऐवजी हिंगोलीच्या सियिंग आईज हेल्पिंग हॅन्डस फाउडेशनने आधार देण्याचे ठरविले आहे. त्यांनी शांतिधामला व्हाइट कोल (जैव इंधन) पुरविण्याचा संकल्प केला आहे. 

हिंगोलीच्या या सामाजिक संस्थेचे समन्वयक प्रवीण जेठेवाड यांच्या संकल्पनेतून कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शंभर अनाथ व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी लागणारे जैविक इंधन पुरविण्याचे ठरविले आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर शांतिधाम सेवाभावी संस्थेचे हे १७ वर्षांचे अखंडित काम सुरू राहावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, शांतिधाम ट्रस्टची चिंता मिटली आहे. 

हेही वाचा- नांदेड - कोरोनाचे ७५ टक्के रुग्ण धोक्याबाहेर , शुक्रवारी २४७ रुग्ण बरे, २३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ​

सियिंग आईज हेल्पिंग हॅन्डस फाउंडेशनच्या या उपक्रमाचे स्वागत 

गोवर्धन स्मशानभूमीवरील शांतिधामच्या या कार्यास अनेक दाते देणगी देत असून, आतापर्यंत व्हाइट कोलसाठी १६ हजार रुपयांची देणगी जमा झाल्याचे सांगण्यात आले. एका मृत्यू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास १८० ते २०० किलो इतके लाकडे हवी असतात. त्यामानाने १६० किलो जैव इंधन पुरेसे ठरते. विशेष म्हणजे लाकडाऐवजी पर्यावरणपूरक जैव इंधनाचा धूर निघत नाही. त्यापासून परिसरातील नागरिक व पर्यावरणासदेखील हानी होत नाही. सियिंग आईज हेल्पिंग हॅन्डस फाउंडेशनच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे. 

हेही वाचानांदेड : लाचखोर ग्रामविस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

शांती धामच्या सदस्यांनी मागील १७ वर्षापासून ही सेवा सुरु केली​

ना नफा ना तोटा या तत्वार शांतीधाम सेवा भावी संस्थेच्या वतीने गोवर्धन घाट स्मशान भूमित अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य, लाकुड, कपडा, शवपेटी अशा अनेक सेवा दिल्या जात आहेत. विशेश म्हणजे महापालीकेचे काम असताना देखील महापालीका अंत्यविधाच्या कामासाठी पुढाकार घेत नसल्याने शांती धामच्या सदस्यांनी मागील १७ वर्षापासून ही सेवा सुरु केली आहे. आतापर्यंत झोळी पसरुन जमा झालेली मदत आणि देणगी दारांच्या मदतीने ही सेवा सुरु होती. परंतु कोरोना काळात या सेवेला घरघर लागली आहे.   


मोक्ष कांडीचा वापराने पर्यावरणाची हानी थांबेल
भविष्यात लाकडांची कमतरता ओळखून नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाऐवजी (व्हाइट कोल) जैव इंधन मोक्ष कांडीचा जास्तीत जास्त वापर केल्यास पर्यावरणाला हानी होणार नाही व झाडांची होणारी कत्तलही थांबवता येऊ शकते. 
-प्रवीण जेठेवाड. 

loading image
go to top