
त्यांनी या मेहनतीचे फ म्हणजे त्यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळाली आहे. संतोष गुट्टेंच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फुलवळ (ता. कंधार, जिल्हा नांदेड) : मानसिंगवाडी (ता. कंधार) येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी गुट्टे यांचा मुलगा संतोष शिवाजी गुट्टे (वय २३) यांनी आई- वडीलांच्या दैनंदिन काबाडकष्ट आणि मेहनतीचे जवळून अनुभव घेत जिद्द आणि चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर अपार मेहनत घेतली. त्यांनी या मेहनतीचे फ म्हणजे त्यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळाली आहे. संतोष गुट्टेंच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष गुट्टेचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी, घरची तीन एकरच शेती असतानाही काबाडकष्ट करुन आणि मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. ५० घराचं छोटंसं गाव असलेली मानसिंगवाडी हे गाव उथळ माळराणाच्या टेकड्यांवर वसलेले. जेथे ना रस्ता ना मूलभूत सुविधा. त्यातच संतोष गुट्टे च पत्रे आणि कुड घेतलेलं घर. घरची परिस्थिती हलाखीची या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी संतोषने कसली होती कंबर.
हेही वाचा - सावधान - आॅनलाइन फसवणुक करून काढले अडीच लाख रुपये
गावात पहिली ते चौथी पर्यंतचीच जिल्हा परिषदेची शाळा याच शाळेत संतोष गुट्टेचे झाले प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे आंबूलगा येथील माणिकप्रभु या शाळेतून झाले. तर अकरावी, 12 वी ही तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण करुन औरंगाबाद येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल ब्रँचमधून शिक्षण पूर्ण झाले आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संतोषने पुणे शहर गाठले.
२०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या पीएसआयच्या जाहिराती नुसार फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या निकालात संतोष गुट्टे ने २५० मार्क मिळवत ९२ वा रँक पटकावला. संतोष गुट्टे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या या यशात माझे आई- वडील , गुरुजन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलून दाखवले.
संपादन- प्रल्हाद कांबळे