esakal | नांदेड : जंगमवाडी ते श्रीनगरपर्यंतचा नादूरुस्त रस्ता पावसाळ्यापुर्वी सुरु करा
sakal

बोलून बातमी शोधा

जंगमवाडी ते श्रीनगर रस्ता

नांदेड : जंगमवाडी ते श्रीनगरपर्यंतचा नादूरुस्त रस्ता पावसाळ्यापुर्वी सुरु करा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड येथील तरोडा नाका, जंगमवाडी येथील मनपाचा शासकीय दवाखाना, लायन्सक्लबचे नेत्रालय ते श्रीनगर येथील पंचशिल ईमारतीपर्यंतचा श्रीनगरच्या बाजुचा रस्ता मजबुतीकरणाचे काम चालु असुन ते पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्यात यावे अशी या परिसरातील जनतेची मागणी होत आहे.

येथील तरोडा नाक्यापासुन निघालेला जंगमवाडी, शासकिय दवाखाना, लायन्सक्लब नेत्रालय ते श्रीनगर येथील पंचशिल ईमारतीपर्यंतच्या रस्ता रुंदिकरणास नांदेड वाघाळा महानगरपालिकेने मान्यता दिली असून गेल्या मार्च महिन्यापासुन या रस्त्याच्या हद्दीमध्ये आलेल्या बांधकामांचे अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली असुन सर्व अतिक्रमण पाडले आहे. जंगमवाडी येथिल लायन्सक्लब नेत्रालयापासुन ते पंचशिल ईमारतीपर्यंत दुतर्फा रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन रस्ता रुंदीकरणास सुरुवात झाली आहे. श्रीनगर ते तरोडा नाका हे अंतर कमी वेळामध्ये पार करण्यासाठी तसेच श्रीनगरच्या मुख्य रस्त्यापेक्षा या रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे दुचाकी तसेच चारचाकीधारक प्रवासी या रस्त्याचा वापर करतात.

हेही वाचा - जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक- कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते तेंव्हा...

हा रस्ता रुंदीकरणाचे काम चालु असल्यामुळे अगोदर या रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे खोदकाम होवुन डाव्या बाजुच्या नालीचे बांधकाम चालु असुन दोन्ही नाल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ता मजबुतीकरण होणार असल्याचे कळते. सद्या खोदकाम करुन ठेवलेल्या दुतर्फा नाल्या सांडपाण्याने पूर्ण भरुन रस्त्यावर पाणी येऊन पादचारी तसेच दुचाकीस्वारांना अंगावर हे सांडपाणी येवुन आपली अडचण होते की काय असे वाटुन या रस्त्यावरील प्रवासी आणि रहिवाशी मोठ्या कसरतीने या रस्त्यावरुन वावरत आहेत. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरुन तरोडा नाक्यापासुन ते पंचशिल ईमारतीपर्यंत अतिशय वेगाने प्रवाह होतो आणी या रस्त्याला नदीचे स्वरुप येते. रस्ता आणि नाली कोणती हे कळत नाही. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे कित्येक प्रवाशी पाण्यात पडल्याचे पहावयास मिळते.

याच रस्त्यावरील रामराव पवार चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर्ण घाण कचरा येथे जमा होतो. त्यामुळे तासन तास हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो आणि दुर्गंधीने येथील जनते प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याच्या नाली बांधकामास नेमकी आता सुरुवात झाली असून पावसाळा तोंडावर आला आहे आणी अतिशय मंद गतीने कमी मनुष्यबळ आणी मोजक्या साधणांच्या सहाय्याने हे काम चालु असल्यामुळे या कामास पुर्ण होण्यास किती महिने लागतील याचा नेम नाही. परंतु दोन्ही बाजुच्या नाल्या खोदुन ठेवल्यामुळे पावसाळ्यामध्ये त्या बुजुन रस्त्याची नदी होईल त्यामुळे पुर्ण पावसाळाभर या रस्त्यावरुन कसा प्रवास करावा हा प्रश्न या परिसरातील रहिवाशांसह रस्त्यावरुन वावरणार्‍या प्रत्येकाला पडला आहे. पावसाळ्यामध्ये हा रस्ता पुर्णपणे बंद होतो की काय अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.

loading image
go to top