नांदेड : युवकांच्या बळावर परिवर्तन घडविणार- निलेश विश्वकर्मा 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 16 December 2020

राज्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा जोडो अभियान सुरू असून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर आता मराठवाड्यात हे अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत आज नांदेड येथे नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

नांदेड - नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची जोमाने बांधनी करून सतेचे परिवर्तन घडविणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा जोडो अभियान सुरू असून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर आता मराठवाड्यात हे अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १५)  नांदेड येथे नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात निलेश विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद ही त्या पक्षात काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यावर असते.  म्हणून वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करून येणाऱ्या काळातील सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वप्नांना साकार करू. पुढे बोलताना ते म्हणाले की, बहुजन युवा कार्यकर्ता इतर पक्षात सातत्याने काम करीत आला आहे.  परंतु त्याला त्या त्या  पक्षात सन्मान व संधी मिळाली नाही. श्रदेय नेते ॲड. आंबेडकर यांच्या आदेशाने चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत सर्व बहुजन युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राजकारणाची नवी नांदी निर्माण करणार असल्याचेही यावेळी विश्वकर्मा म्हणाले. 

या कार्यक्रमात प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, पक्षनिरीक्षक चेतन गांगुर्डे, युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ॲड. सचिन झोरे, अक्षय बनसोडे यांच्यासमवेत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले शिवाभाऊ नरंगले, महिला आघाडीच्या अध्यक्षा दैवशाला पांचाळ, निरंजना आवटे, महानगराध्यक्ष आयुब खान,  विठ्ठल गायकवाड, महासचिव श्याम कांबळे, साहेब बेळे, सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश नाईक व प्रा. साहेब बेले यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक कापशीकर यांनी मानले. या कार्यक्रमानंतर युवा आघाडीत काम करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शेकडो बहुजन समाजातील तरुणांनी रीतसर वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे सदस्य होऊन इच्छुक पदासाठी मुलाखती दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत सांगळे शेख बिलाल पद्माकर सोनकांबळे, केशव कांबळे, दिलीप जोंधळे, उन्मेश ढवळे, साहेबराव थोरात, सुरेश गजभारे, विनायक गजभारे, सुनील सोनसळे, कनिष्क सोनसळे, किशोर भुजबळ, नागसेन कसबे, बाळासाहेब डोंगरगावकर. जयदीप पैठणे, साहेबराव पंडित,  सोपांन वाघमारे, काकासाहेब डावरे, बंटीभाऊ मोरे,  विजय भंडारे, अनिल कांबळे, अतिश ढगे, मायाभाऊ भद्रे, विशाल येडके, सचिन कदम आदींनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The strength of the youth will change Nilesh Vishwakarma nanded news