esakal | Nanded: दिवाळीपूर्वी उसाची उर्वरित रक्कम मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

वाघलवाडा साखर कारखान्याचे अग्निबाॅयलर प्रदीपन

उमरी : दिवाळीपूर्वी उसाची उर्वरित रक्कम मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरी : शेतकऱ्यांना राहिलेली उर्वरित ऊसाची रक्कम दिवाळी अगोदर मिळणार असून ऊस हे शाश्वत पिक असून शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करावी. या भागात तीन साखर कारखाने हे शेतक-यांसाठी उभारण्यात आले असून (कै) लक्ष्मणराव हस्सेकर यांनी पूर्वी वाघलवाडा साखर कारखाना मोठ्या कष्टाने उभा केला.

स्वर्गीय शंकरराव चव्हाण व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या भागात हरितक्रांती घडवून या भागातील शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करु, असे आश्वासन व्हीपीके व एमव्हीके उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी दिले.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

उमरी तालुक्यातील वाघलवाडा साखर कारखान्याच्या प्रथम बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ गळीत हंगाम २०२१ -२२ च्या शुभारंभ प्रसंगी मंगळवारी (ता. १२) चेअरमन कवळे गुरूजी बोलत होते. प्रारंभी कोलंबीचे महंत यदुबन महाराज, बामेराज महाराज, संतोषपुरी महाराज चोळाखेकर आदींच्या उपस्थित प्रथम बाॅयलर अग्नीप्रदिपन पूजन करुन शुभारंभ करण्यात आले. यावेळी अॅड. माणिकराव हस्सेकर, गणपतराव हस्सेकर, श्याम पाटील चोळाखेकर, माधवराव पाटील शिंगणापूरकर, देवराव पाटील हस्सेकर, किशोर पाटील लगळुदकर, प्रविण पाटील लगळुदकर, दिगंबरराव कदम करकाळेकर, पाडुरंग पाटील वाघलवाडेकर,

बापुसाहेब पाटील कौडगावकर, माधवराव पाटील ढगे, प्रभू पाटील पुयड, गणेशराव पाटील ढोलउमरीकर, लक्ष्मणराव पाटील हरेगावकर, तानाजी पाटील, उत्तमराव पाटील हंबर्डे, डी. बी. कदम, गणेशराव पाटील शिंधीकर, संदीप पाटील कवळे, परमेश्वर पाटील कवळे, नागनाथ पांचाळ, व्यवस्थापक श्रीराम अंबटवार, श्री. येंडाळे, दिगांबर अंबटवार, श्री. पवार, श्री. पडोळे, श्री. शेळके, श्री. वाघ, श्री. उमाटे आदीसह ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

श्री. कवळे गुरूजी म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांना ऊस पिकांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी या भागात तीन साखर कारखाने उभारले. एवढेच नाही तर अजून वीज निर्मिती कारखाना आदींसह इतर कारखाने उभारुन तरुणांच्या हाताला रोजगार देऊ, असे आश्वासनही श्री. कवळे गुरूजी यांनी दिले. यावेळी संतोष पुरी महाराज, अॅड. माणिकराव हस्सेकर, दिगांबरराव कदम यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यु. जी. कदम यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव भोसले यांनी सुत्रसंचालन केले तर एस. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले.

loading image
go to top