नांदेड : अभ्यास झाला नसल्याने युवतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sucide case

नांदेड : अभ्यास झाला नसल्याने युवतीची आत्महत्या

नांदेड ः पोलिस भरती आणि सैन्य परिक्षेचा अभ्यास झाला नसल्यामुळे ताणतणावात असलेल्या १९ वर्षाच्या युवतीने घरातील फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

स्नेहनगर पोलिस कॉलनीत शीतल सुकरे (वय १९, रा. तेलंगवाडी, ता. कंधार, हल्ली मुक्काम स्नेहनगर पोलिस कॉलनी) ही युवती पोलिस भरती आणि सैन्य परिक्षेचा अभ्यास करत होती. मात्र, परिक्षेचा अभ्यास झाला नसल्यामुळे ती ताणतणावात होती. त्यातच तिने राहत्या घरी रविवारी (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत महिला पोलिस शिपाई अनिता मेथेवाड यांनी दिलेल्या माहितीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नायक मंगनाळे करत आहेत.

विष पिऊन आत्महत्या

देगाव (ता. नायगाव) येथील रमेश बाबूराव पांचाळ (वय ३०) याने विष प्राशन केल्याने उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस जमादार गोटमवाड यांनी दिलेल्या माहितीवरून कुंटुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नायक गिते करत आहेत.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

विहिरीत पडून मृत्यू

हरडफ (ता. हदगाव) येथील पुंजाराम मारोतराव सुर्यवंशी (वय ४६) हा शेतातील विहिरीवर सोमवारी (ता. १५) सकाळी नऊच्या सुमारास गेला. त्यावेळी पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मरण पावला. याबाबत पोलिस पाटील विनायक कदम यांनी दिलेल्या माहितीवरून हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार गायकवाड करत आहेत.

loading image
go to top