esakal | नांदेड - रविवारी ४९४ रुग्ण कोरोनामुक्त, ३९३ पॉझिटिव्ह, दिवसभरात आठ बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.१२) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता.१३) एक हजार १५२ आहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७४४ निगेटिव्ह आणि ३९३ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ११ हजार ४८४ वर जाऊन पोहचली आहे. 

नांदेड - रविवारी ४९४ रुग्ण कोरोनामुक्त, ३९३ पॉझिटिव्ह, दिवसभरात आठ बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरूच आहे. रविवारी (ता. १३) प्राप्त झालेल्या अहवालात आठ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू तर ३९३ कोरोना बाधितांची भर पडली असून, दहा दिवसाच्या उपचाराने ४९४ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (ता.१२) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी रविवारी (ता.१३) एक हजार १५२ आहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७४४ निगेटिव्ह आणि ३९३ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ११ हजार ४८४ वर जाऊन पोहचली आहे. 

हेही वाचा-  नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कसा तो वाचा? ​

४९४ रुग्ण दहा दिवसाच्या उचारानंतर बरे 

कैलास नगर नांदेड पुरुष (वय ५०), शारदानगर नांदेड पुरुष (वय ६५), तेहरा नगर नांदेड पुरुष (वय ३८), धानोरा तालुका नायगाव पुरुष (वय ७५), भावसारचौक नांदेड महिला (वय ६२), हदगाव पुरुष (वय ७५), कोठाळा हदगाव पुरुष (वय ६५) व रामपुरथडी बिलोली येथील पुरुष (वय ६२) या आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या ३११ इतकी झाली आहे. 


जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर- २०, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- २०, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मध्ये असलेले- ३२४, भोकर- पाच, देगलूर- दोन, धर्माबाद- ११, किनवट- १८, माहूर- १०, मुखेड-सात, हदगाव-१०, कंधार- आठ, लोहा- सात, मुदखेड- दोन, नायगाव- २५ आणि उमरी- १३ असे ४९४ रुग्ण दहा दिवसाच्या उचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालय व कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. आतापर्यंच सात हजार ३५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचले पाहिजे- ऐकावे ते नवलच ! नांदेडकर करतात दिवसाला पाच ट्रक अंडे फस्त ​

३४ रुग्णांची प्रकृती गंभीर

शनिवारच्या आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. यात महापालिका क्षेत्रातील - २१८, नांदेड ग्रामीण- ११, अर्धापूर-एक, माहूर-दोन, हिमायतनगर-पाच, लोहा-नऊ, भोकर-तीन, मुखेड- ४०, बिलोली- तीन, हदगाव-पाच, किनवट-३३, नायगाव- नऊ, धर्मबाद- नऊ, उमरी-तीन, कंधार- आठ, मुदखेड-१२, निजामबाद- एक, जम्मु कश्‍मीर- एक, आदिलाबाद-एक, परभणी- एक व हिंगोली - तीन असे ३९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णसंख्या ११ हजार ४८४ इतकी झाली असून, त्यापैकी तीन हजार ७५१ रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर 

रविवारी पॉझिटिव्ह रुग्ण- ३९३ 
रविवारी कोरोना मुक्त रुग्ण- ४९४ 
रविवारी मृत्यू- आठ 
एकूण बाधित- ११ हजार ४८४ 
एकूण कोरोनामुक्त - सात हजार ३५५ 
एकूण मृत्यू- ३११ 
उपचार सुरु- तीन हजार ७५१ 
गंभीर रुग्ण- ३४