

Nanded Talathi Gets Two Year Jail Term in Rs 3000 Bribery Case Linked to Agricultural Land Mutation and Seven Twelve Record Entry
sakal
नांदेड : आईच्या नावाने खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय गजानन मेहुनकर, असे दोषी तलाठ्याचे नाव असून, शुक्रवारी (ता. ३०) हा निकाल देण्यात आला.