Nanded : शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
Nanded Teachers unions agitation
Nanded Teachers unions agitation

नांदेड : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह इतर मागण्यांसाठी शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

राज्य सरकारच्या नकारात्मक शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण विभागग्रस्त बनला आहे. राज्यकर्त्यांनी स्वतःसाठी आकर्षक पेन्शन योजना लागू केली. मात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कुचकामी अंशदायी पेन्शन योजना लागु केली. गेल्या वीस वर्षांपासून अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विनावेतन व अल्पवेतनावर काम करत आहेत, ही खेदाची बाब आहे. आजही त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

त्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष आणि नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडाभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. त्यानुसार रविवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांचा मोर्चा धडकला.

या आहेत मागण्या राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. अंशदायी पेन्शन योजना लागु करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागु करावी. शिक्षकांना तीन लाभाची अश्वाशीत प्रगती योजना लागु करा. तासिका तत्वावर काम करणाऱ्यांना नियमित प्राध्यापक म्हणून मान्यता द्यावी. शिक्षकांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा. शिक्षकांच्या पाल्यांना सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा शासनादेश लागु करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com