नांदेड : तृतीयपंथीयांनी फोडला आयुक्तांसमोर टाहो, काय आहे कारण ?

प्रल्हाद कांबळे
Friday, 16 October 2020

येत्या सर्वसाधारण सभेत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केली निवेदनाद्वारे मागणी.

नांदेड : गत अनेक वर्षांपासून तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीसाठीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना जिवंतपणी राहायला घर नको आणि मृत्यूनंतर दफन करायला जागा नको. अशा गंभीर समस्येचा सामना नांदेड शहरातील तृतीयपंथी यांच्यासमोर आहे. कमल फाऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढे सरसावत गत सात वर्षांपासून लोकशाही मार्गाने तृतीयपंथी यांना सामाजिक न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहे.

तृतीयपंथीयांना राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बॅंक अकाऊंट आणि घरकुलाचा प्रश्न मार्गी लावला. परंतु स्मशानभुमीसाठी वेळोवेळी निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन तसेच विविध आंदोलने करुन हा प्रश्न जैसे थे राहिला. दरवेळेस सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव घेऊन मंजुर करण्यात येणार असल्याचेच सांगण्यात आले होते. परंतु अद्याप तो ठराव ठेवण्यात आला नसल्यामुळे नांदेड शहरातील तृतीयपंथी यांच्या शिष्टमंडळाने कमल फाऊंडेशनचे अमरदिप गोधने यांच्यासमवेत महानगरपालिकेत धाव घेतली.

हेही वाचानांदेड : अपहरण झालेल्या मुलाची सुटका, तामसा पोलिसांची कारवाई

शिष्टमंडळात यांची होती उपस्थिती

महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत उपायुक्त अजितपालसिंग संधु हे सुद्धा उपस्थित होते. आयुक्तांनी तृतीयपंथी यांच्या वेदना ऐकुन घेतल्या व येत्या सर्वसाधारण सभेत तुमच्या स्मशानभूमी साठीचा ठराव ठेवून तो सर्वानुमते मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच उपायुक्त सिंग यांच्या कडुन सुद्धा पाठपुरावा सुरुच असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शानुर बाबु बकश, गौरी देवकर यांच्यासह अमरदिप गोधने, राहुल साळवे, महेश गुपिले आणि साई कदम हे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. कल्याणकर यांना मातृशोक

नांदेड - खरबी ता. भोकर येथील श्रीमती कलावतीबाई विठ्ठलराव कल्याणकर यांचे नुकतेच 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने दु: खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर खरबी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या प्राचार्य डॉ. आबासाहेब कल्याणकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात 5 मुले, 4 मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. कलावतीबाई ह्या मनमिळावू स्वभाच्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Third party blows up in front of the commissioner, what is the reason nanded news