esakal | नांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.१९) एक हजार ४४३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये एक हजार ७० निगेटिव्ह, ३३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १३ हजार ३१६ वर जाऊन पोहचला आहे.

नांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मागील दोन दिवसाच्या आकडेवारीवरून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असे वाटत असतानाच शनिवारी (ता.१९) पुन्हा ३३२ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात सात जणांचा मृत्यू तर २९७ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

अँन्टीजन टेस्ट किट व आरटीपीसीआर पद्धतीने शुक्रवारी (ता.१८) घेण्यात आलेल्या स्वॅबचा शनिवारी (ता.१९) एक हजार ४४३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये एक हजार ७० निगेटिव्ह, ३३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १३ हजार ३१६ वर जाऊन पोहचला आहे. दत्तनगर नांदेड पुरुष (वय ८०), शाहूनगर नांदेड पुरुष (वय ४०), पिंपळगाव महिला (वय ८०), बोधडी (खूर्द) किनवट पुरुष (वय ६०), सगरोळी तालुका बिलोली पुरुष (वय ६०), सगरोळी बिलोली महिला (वय ७०) लालवाडी नायगाव पुरुष (वय ६६) या सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत उपचारादरम्यान साडेतीनशे रुग्ण दगावले आहेत. 

हेही वाचा- बेरोजगारांसाठी पिठाची गिरणी ठरतेय उपजिविकेचे साधन

आतापर्यंत नऊ हजारपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - २७, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - आठ, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि घरी आयसोलेशन मधील ७८, बारड, एक, भोकर-तीन, लोहा २२, कंधार- एक, किनवट -२१, उमरी- आठ, नायगाव- सात, धर्माबाद- २२, हदगाव- तीन, बिलोली-१६, मुदखेड- २८ आणि खासगी रुग्णालयातील १२ असे २९७ रुग्ण दहा दिवसाच्या उपचाराने कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालय व कोविड सेंटर मधून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत नऊ हजार ५४ इतके रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचले पाहिज- जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामुळे निनावी ‘पत्राला’ फुटली वाचा ​

तीन हजार ८४५ रुग्णांवर उपचार सुरू 

आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नांदेड वाघाळा महापालिका- नांदेड ग्रामीण- सहा, लोहा-१२, हदगाव- सात, कंधार-पाच, बिलोली-नऊ, अर्धापूर-१५, किनवट-२१, मुखेड-३०, धर्माबाद-नऊ, देगलूर-एक, नायगाव-नऊ, हिमायतनगर- दोन, मुदखेड- सहा, माहूर-२२, भोकर-आठ, हिंगोली-पाच, परभणी- दोन, लातूर- एक, यवतमाळ- तीन व बीड- एक असे ३३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ३१६ इतकी झाली असून, त्यापैकी तीन हजार ८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी ३४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर ः 

शनिवारी पॉझिटिव्ह - ३३२ 
शनिवारी कोरोना मुक्त- २९७ 
शनिवारी मृत्यू - सात 
एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या- १३ हजार ३१६ 
एकूण कोरोना मुक्त- नऊ हजार ५४ 
एकूण मृत्यू- ३५० 
उपचार सुरू - तीन हजार ८४५ 
गंभीर रुग्ण- ३४ 
अहवाल बाकी- एक हजार २८८