
गुरुवारी ९५५ अहवाल प्राप्त झाले. यात नांदेड महापालिका क्षेत्रातील - ११, नांदेड ग्रामीण - एक, कंधार - ११, हिमायतनगर - एक, अर्धापूर - एक, बारड - एक, लोहा - एक, हदगाव - चार, भोकर - एक, किनवट - एक, यवतमाळ - एक आणि उत्तरप्रदेश - एक असे ३५ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले.
नांदेड - जिल्ह्यात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता. २६) ९५५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३४ रुग्ण कोरोनामुक्त, ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, गुरुवारी दिवसभरात एकही रुग्ण दगावला नसल्याने आरोग्य विभागास दिलासा मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने बुधवारी (ता. २५) शेकडो संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीकरता प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी ९५५ अहवाल प्राप्त झाले. यात नांदेड महापालिका क्षेत्रातील - ११, नांदेड ग्रामीण - एक, कंधार - ११, हिमायतनगर - एक, अर्धापूर - एक, बारड - एक, लोहा - एक, हदगाव - चार, भोकर - एक, किनवट - एक, यवतमाळ - एक आणि उत्तरप्रदेश - एक असे ३५ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार १९६ इतकी झाली आहे.
हेही वाचा - औरंगाबाद- हैदराबाद आणि अमरावती- तिरुपती या दोन्ही उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ- वेळेत बदल
मृत्यूचा आकडा ५४७ वर स्थिर
दुसरीकडे विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्यापैकी - दोन, श्री गुरुदोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - दोन, मनपाअंतर्गत एनआरआय भवन आणि गृह विलगीकरण कक्षातील - १५, मुखेड - एक, खासगी रुग्णालय - १२, औरंगाबाद संदर्भित एक आणि हैदराबाद येथील संदर्भीत - एक असे ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९ हजार ५० इतकी असून, गुरुवारी दिवसभरात बाधित रुग्णांपैकी एकचाही मृत्यू झाला नसल्याने आरोग्य विभागास दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५४७ वर स्थिर आहे.
हेही वाचले पाहिजे - नांदेड - १५ मालवाहु एसटी बसने केली ८६ लाखांपेक्षा अधिकची कमाई
१५ बाधितांची प्रकृती गंभीर
गुरुवारी संध्याकाळपर्यंत विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १७२ व जिल्हा शासकीय रुग्णालयात - ७० अशा मिळुन २४२ खाटारिक्त आहेत. जिल्हाभरातील विविध शासकीय व निमशासकीय रुग्णालय व गृहविलगीकरण कक्षात ४०७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १५ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. ४४६ स्वॅबची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
कोरोना मीटर -
आज पॉझिटिव्ह रुग्ण - ३५
आज कोरोनामुक्त - ३४
आज मृत्यू - शुन्य
एकुण पॉझिटिव्ह - २० हजार १९६
एकुण कोरोनामुक्त - १९ हजार ५०
एकुण मृत्यू - ५४७
उपचार सुरु - ४०७
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत - ४४६