नांदेडला तीन दिवसात १३ हजार लसीकरण

महापालिकेचे नियोजन यशस्वी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
लसीकरण
लसीकरण sakal

नांदेड : ‘मिशन कवच कुंडल’ अभियानातंर्गत नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने तीन दिवसात ७५ तासामध्ये १३ हजार २७२ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सदरील मोहिम यशस्वी करण्यासाठी उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ७५ तासाचे मिशन कवच कुंडल अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत नांदेड वाघाळा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील जंगमवाडी, शिवाजीनगर, हैदरबाग, सिडको आदींसह महापालिकेच्या १४ रुग्णालयात ७५ तासाची लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

लसीकरण
सिंदखेड राजा : जिजाऊ सुष्टी जवळ ट्रॅव्हलला आग

या मोहिमेस नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसाच्या या मोहिमेत उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, डॉ. बद्रीउद्दीन, सहायक आयुक्त संजय जाधव, राजेश चव्हाण, डॉ. फरतुल्ला बेग, डॉ. रईसोद्दीन, रावण सोनसळे, अविनाश अटकोरे यांच्यासह ८० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, मिशन कवच कुंडलमध्ये उत्कृष्ट सेवा देऊन लसीकरण करणा-या सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा आरोग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांची प्रशंसा केली.

या वेळी सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे व मातृसेवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल हमीद व आरोग्य सहायक सुरेश आरगुलवार व परिचारिका, आशा वर्कर्स यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सत्कार केला. यावेळी उपायुक्त संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

लसीकरण
काम सोडण्यासाठी डोक्यावर उभे करू : मुश्रीफ

तीन दिवस लसीकरण

महापालिकेच्या वतीने लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी बाजारपेठ, प्रार्थनास्थळे तसेच नगर आणि कॉलनीमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गुरूवारी (ता. २१) तीन हजार ६६७, शुक्रवारी (ता. २२) चार हजार ५५५ तर शनिवारी (ता. २३) पाच हजार ५० असे एकूण १३ हजार २७२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com