Nanded News
sakal
नांदेड
Nanded News: व्यापाऱ्याची दीड कोटीची फसवणूक; नागपूरच्या कुटुंबावर गुन्हा
Loan Fraud: नांदेड येथील व्यापाऱ्याची तब्बल १.५ कोटी रुपयांची कर्जाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. नागपूरच्या भरूट कुटुंबातील चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड : शहरातील शिवाजीनगर परिसरातील एका व्यापाऱ्याची कर्जाच्या नावाखाली तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१५ ते २०२४ या दरम्यान घडला असून, नागपूर येथील भरूट कुटुंबातील चार जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

