
गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं पूरस्थिती निर्माण झालीय. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यामुळे झालंय. नांदेडला गेल्या आठवड्यात पावसानं झोडपलं. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे खराब झाल्यानं तरुण शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं. शेतातल्याच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तरुण मुलानं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं वडिलांनीही १२ तासात प्राण सोडले. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा इथं ही घटना घडलीय.