esakal | नांदेडला मोठा हादरा : मंगळवारी पहिल्यांदाच १३४ रुग्णांची भर, १० मृत्यू, संख्या पोहचली १५२८ वर  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. २७ जुलै रोजी जूना कौठा ५० वर्षीय पुरुष, सिडको ६७ वर्षीय, मुदखेड ७० वर्षीय महिला, मोमीनपूरा किनवट ७० वर्षीय महिला, कासराळी ता. बिलोली ८० वर्षीय पुरुष, नविन मोंढा ६३ वर्षीय पुरुष, रिठ्ठा ता. भोकर ५७ वर्षीय पुरुष, देगलूर ६५ वर्षीय महिला, कुंभारगल्ली वजिराबाद ७४ वर्षीय पुरुष, वजिराबाद ७१ वर्षीय महिला. यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

नांदेडला मोठा हादरा : मंगळवारी पहिल्यांदाच १३४ रुग्णांची भर, १० मृत्यू, संख्या पोहचली १५२८ वर  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मंगळवार (ता. २८) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार १३४ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ३० व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २७ जुलै रोजी जूना कौठा ५० वर्षीय पुरुष, सिडको ६७ वर्षीय, मुदखेड ७० वर्षीय महिला, मोमीनपूरा किनवट ७० वर्षीय महिला, कासराळी ता. बिलोली ८० वर्षीय पुरुष, नविन मोंढा ६३ वर्षीय पुरुष, रिठ्ठा ता. भोकर ५७ वर्षीय पुरुष, देगलूर ६५ वर्षीय महिला, कुंभारगल्ली वजिराबाद ७४ वर्षीय पुरुष, वजिराबाद ७१ वर्षीय महिला. यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ७६ एवढी झाली आहे. यात ६९ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २८४ अहवालापैकी ८९ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार ५२८ एवढी झाली आहे. यातील ७७० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ६७७ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ११ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या ३० बाधितांमध्ये पंजाब भवन कोवीड सेंटरमधून २९, लोहा कोवि्ड सेंटरमधून सात, औरंगाबाद येतील दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा -  जगातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाचा वर्धापन दिन साजरा...कुठे झाला ते वाचा....

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील पाठकगल्ली १९, किल्ला रोड एक, शिवाजीनगर एक, शारदानगर चार, अंबिकानगर एक, हिंगोली गेट एक, नविन कौठा दोन, शिवशक्तीनगर एक, भावसार चौक एक, हैदरबाग एक, दत्तनगर एक, मोमीनपूरा एक, दिलीपसिंग काॅलनी दोन, पीजी हाॅस्टेल एक, हडको चार, सिडको चार, स्टाफ जीएमसी एक, वाजेगाव एक, रायखोड भोकर एक, कुंभार गल्ली भोकर एक, कासराळी ता. बिलोली एक, सगरोळी ता. बिलोली नऊ, बापूनगर ता. देगलूर दोन, देशपांडे गल्ली देगलुर दोन, लाईनगल्ली देगलूर चार, बापू निवास साधनानगर देगलूर दोन, नांदूर देगलूर एक, रफिक काॅलनी देगलुर एक, कोथे पिंपळगाव देगलूर एक, नाथनगर देगलुर एक, देगलुर शहर एक, कांतीकल्लुर देगलूर पाच, तोटावार गल्ली देगलुर एक, आलापूर देगलूर एक, घुम्टबेस देगलूर एक, भुतनहिप्परगा देगलूर एक, शांतीनगर धर्माबाद एक, रामनगर धर्माबाद तीन, देविगल्ली धर्माबाद एक, गेट दोन धर्बााद दोन, हदगाव दोन, बामणी हदगाव एक, शिराढोण तााडा. कंधार एक, दिग्रस कंधार एक, बारुळ कंधार एक, रंगारगल्ली कंधार एक, मोमीनपूरा किनवट एक, वाहेगाव बेटसांगवी एक, जानापूरी लोहा एक, जाहूर मुखेड एक, शिवाजीनगर मुखेड एक, सराफा गल्ली मुखेड एक, दापका मुखेड एक, लग्ेलीनगल्ली मुखेड एक, बापशेटवाडी ता. मुखेड दोन, खरब खंडगाव ता. मुखेड पाच, अंबुलगा ता. मुखेड दोन, मुक्रमाबाद दोन, महाकाली गल्ली मुखेड एक, कोळी    गल्ली मुखेड चार, मुखेड शहर एक, नायगाव सात हिंगोली एक, जालना एक, पुसद एक,परभणी दोन.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ६७७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २३५, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १५, जिल्हा रुग्णालय येथे २५, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १४, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १०६, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ६२, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर १३, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे एक, लोहा कोविड केअर सेंटर येथे चार, कंधार कोविड केअर सेंटर येथे आठ, भोकर दोन, धर्माबाद १५, खाजगी रुग्णालयात ४५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच, निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करा - दुचाकी चोरट्यांकडून सहा दुचाकीसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

घेतलेले स्वॅब- १२ हजार ९४०
निगेटिव्ह स्वॅब- १० हजार २४०
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १३४
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १५२८
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-५०
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-८
मृत्यू संख्या- ७६ (जिल्ह्यातील ६९ तर बाहेर जिल्ह्यातील सात)
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ७७०
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ६७७
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २६४