Nanded: लसीकरणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

अर्धापूर : लसीकरणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

अर्धापूर : जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा व त्यांना संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता यावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. २४) पार्डी गावात घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त केले.

त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी गावकऱ्यांना आवाहन करुन लसीकरणाचे महत्व पटवून दिले. जिल्हा प्रशासनात अनेक अधिकारी व कर्मचारी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून समाजाप्रती व आपल्या गावाप्रती उत्तरदायीत्व म्हणून बुधवारी आपआपल्या गावात लसीकरण साक्षरतेसाठी व नागरिकांना लस घेण्यास प्रवृत्त केले. लसीकरणाची ही मोहिम अधिक व्यापक केली जाणार असून कोणताही नागरिक यापासून वंचित राहू नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनातर्फे घेतली जात आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, दिलीप बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, गटशिक्षणाधिकारी ससाने, विस्तार अधिकारी गंगाधर राठोड, कृषी विस्तार अधिकारी बी. पी. सूर्यवंशी, के. बी. कल्याणकर आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जिजाबाई कांबळे, दाजीसाहेब देशमुख, निळकंठ मदने, हणमंत देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. पवार, डॉ. पल्लवी फिसके, स्वाती खरटमोरे, कोंडाबाई कांबळे, सरस्वती पारधे, शेख फिरोज, मुबीन नदीफ, शेख रफीक, शेख एजाज आदी उपस्थित होते.

loading image
go to top