esakal | नांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी आलेल्या अहवालात उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांपैकी ५३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती. शुक्रवारी त्यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २९५ इतका झाला.

नांदेड - बारा मृत्यू , ३९६ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड -  कोरोना बाधितांचे रोज नवे आकडे समोर येत असतानाच शुक्रवारी (ता.११) १२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी ३९६ जण पॉझिटिव्ह आले असून, २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.


गुरुवारी आलेल्या अहवालात उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांपैकी ५३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती. शुक्रवारी त्यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा २९५ इतका झाला.

हेही वाचा- धक्कादायक घटना : मुल होत नसल्याने पती- पत्नीची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या..​

५५ रुग्णांची प्रकृती गंभीर

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, कोविड सेंटर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी गच्च भरले आहेत. तरीही बाधित रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही. संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १० हजार ७०९ वर पोहचली आहे. सध्या तीन हजार ६०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ५५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. २१३ संशयितांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचा- संगणक साक्षरते अभावी ऑनलाइन शिक्षणात सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडथळा

शुक्रवारी सुटी दिलेले रुग्ण

श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय दहा, पंजाब भवन कोविड सेंटर ९४, मुखेड १७, देगलूर १३, कंधार १६, धर्माबाद आठ, नायगाव दोन, मुदखेड दोन, किनवट ४८, हदगाव ११, अर्धापूर १५, बारड- एक व खासगी रुग्णालयातील १६ असे २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत सहा हजार ७४५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

२४ तासात मृत्यू  १२  मृत्यू

शुक्रवारी मागील २४ तासात नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील हिमायतनगर महिला (वय -३७), कौठा हदगाव महिला (वय-६५ ), नवीपेठ मुखेड पुरुष (वय ६८), आंबेडकरनगर लोहा पुरुष (वय- ८०), पाला ता.मुखेड पुरुष (वय ७०), इब्राहिमपूर ता.देगलूर महिला (वय -६०), मंगलसांगवी ता.कंधार पुरुष (वय- ७०) या सात रुग्णांसह किनवट महिला (वय- ८५), सावरगाव ता.नायगाव महिला (वय- ७०), आंबेडकरनगर नांदेड महिला (वय- ६५), कुंडलवाडी ता.बिलोली पुरुष (वय-५५) व फरांदेनगर नांदेड येथील पुरुष (वय- ८१) अशा १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत २९५ रुग्णांचा मृत्यू झाला.

आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्टद्वारे आढळलेले रुग्ण

गुरुवारी आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटच्याद्वारे तपासणी केली होती. यात नांदेड महापालिका हद्दीत २०३, नांदेड ग्रामीण २४, भोकर चार, अर्धापूर ११, देगलूर तीन, किनवट २०, लोह्यात १६, उमरी सात, बिलोलीत १९, नायगाव १६, मुखेड २९, धर्माबाद १३, हदगाव ११, कंधार आठ, मुदखेड दोन, माहूर चार, परभणी एक, लातूर एक, हिंगोली एक, यवतमाळ एक असे ३९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

नांदेड कोरोना मीटर

शुक्रवारी पॉझिटिव्ह - ३९६
शुक्रवारी कोरोनामुक्त - २६१
शुक्रवारी मृत्यू - १२
एकुण बाधित - १० हजार ७०९
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - सहा हजार ७४५
आतापर्यंत मृत्यू - २९५
सध्या उपचार सुरु - तीन हजार ६०८
सध्या गंभीर रुग्ण - ५५
अहवाल बाकी - २१३