नांदेड - सोमवारी दोनशे रुग्ण कोरोना मुक्त, पाच जणांचा मृत्यू  

शिवचरण वावळे
Monday, 5 October 2020

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना चाचणींचा दर कमी झाल्याने मागील आठवडाभरापासून कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट झाली होती. परंतु जिल्हा अतिसंवेदन शिव स्थिती मध्ये असल्याने केंद्र सरकारने कोरोना बाधित रुग्णांच्या चाचणीमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यास २५ हजार किट मिळ्याल्याने कोरोना बाधित रुग्णसंख्येत भर पडल्यास नवड वाटणार नाही. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात कोरोना चाचणीसी संख्या वाढणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. आहे. 

नांदेड - मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणीचा वेग मंदावला होता. परंतु जिल्ह्यासाठी २५ हजार कोरोना किट उपलब्ध झाल्याने कोरोना चाचणीचा वेग वाढणार आहे. सोमवारी (ता.पाच) प्राप्त झालेल्या ७९८ अहवालापैकी ६५५ निगेटिव्ह, १३१ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू तर, दहा दिवसानंतर २०० रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

रविवारी (ता. चार) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. पाच) ७९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात १३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार ४५२ वर जाऊन पोहचली आहे. सोमवारी दयानंदनगर नांदेड महिला (वय ८०), दत्तनगर नांदेड पुरुष (वय ६५), भोगाव अर्धापूर पुरुष (वय ६०), कंधार महिला (वय ६५) व निवघा मुदखेड पुरुष (वय ६५) या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला.

हेही वाचा- ‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग

सोमवारी या भागात आढळुन आले रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत ४३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 
सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत- ८०, नांदेड ग्रामीण- तीन, अर्धापूर - एक, किनवट- चार, धर्माबाद- एक, लोहा-१२, हदगाव-तीन, मुखेड-नऊ, नायगाव-तीन, देलगूर- पाच, कंधार- चार, बिलोली- एक, हिंगोली- तीन, परभणी- तीन असे १३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 

हेही वाचले पाहिजे- मॉं जिजाऊंचे संस्कारच बलात्काराच्या घटना थांबवू शकतात- डॉ गंगाधर घुटे ​

नांदेड कोरोना मीटर 

सोमवारी कोरोनाबाधित रुग्ण- १३१ 
सोमवारी कोरोना मुक्त- २०० 
सोमवारी मृत्यू- पाच 
एकूण पॉझिटिव्ह-१६ हजार ४५२ 
एकूण कोरोनामुक्त- १३ हजार आठ 
एकूण मृत्यू-४३१ 
उपचार सुरु- दोन हजार ९१३ 
गंभीर रुग्ण- ६५ 
प्रतिक्षित अहवाल- ६१० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Two hundred patients were released on corona on Monday Five people died Nanded News