Nanded News : गारपिटीमुळे चार तालुक्यांतील पिके जमीनदोस्त; दोघांचा मृत्यू; साडेसात हेक्टरवरील पिके बाधित

जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, धर्माबाद, उमरी तालुक्यांना रविवारी (ता. ११) सायंकाळी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने झोडपले.
nanded unseasonal rain crop damage two death agriculture abhijit raut
nanded unseasonal rain crop damage two death agriculture abhijit rautSakal

Nanded News : जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, धर्माबाद, उमरी तालुक्यांना रविवारी (ता. ११) सायंकाळी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

तसेच एकाचा वीज कोसळून तर एकाचा वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार विजय अवधानी यांनी घेतली.

रविवारी दुपारनंतर जिल्ह्यातील हिमायतनगर, भोकर, धर्माबाद, उमरी आदी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे गारपीटीत ६४ गावे बाधित झाली आहेत. यात भोकर तालुक्यातील तीन, धर्माबादमध्ये चार,

उमरीत ३५ तर हिमायतनगर तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. यात २३ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सात हजार २१८ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत, बागायत आणि फळ पिकांचे नुकसान झाले आहे. जिराईत पिकाचे सर्वाधिक नुकसान हिमायतनगर तालुक्यात सहा हजार ९९० हेक्टरवर झाले आहे.

त्यापाठोपाठ उमरी तालुक्यात सहा हजार ५७१ हेक्टर, धर्माबाद तालुक्यात एक हजार ३४५ हेक्टर तर भोकर तालुक्यात ५०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बागायत पिकात उमरी तालुक्यात एक हजार २६२ हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात २१७ हेक्टर, भोकर तालुक्यात ५० हेक्टर तर धर्माबाद तालुक्यात ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फळ पिकांचे सर्वाधिक नुकसान उमरी तालुक्यात २२७ हेक्टर झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com