नांदेड : जिल्हाभरात वटवृक्षांची लागवड सुरू

सीईओ वर्षा ठाकूर घुगे; वृक्षारोपणातून नांदेड हरित करण्याचा संकल्प
Nanded vat purnima tree Planting
Nanded vat purnima tree Plantingsakal

नांदेड : भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला पर्यावरण साक्षरतेचा दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. यादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करण्याची परंपरा आहे. यातील पर्यावरणाचा धागा लक्षात घेता प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मान्यवरांच्या हस्ते वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने त्या बोलत होत्या. गावात तसेच आपल्या परिसरात वटवृक्षाची लागवड करुन ऑक्सीजन बँक निर्माण करावी. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनचे मुल्य प्रत्येकाने ओळखले असून ऑक्सीजन वृध्दीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. हरित नांदेडच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे उचलल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम - कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार आदींची उपस्थिती होती.

तालुकानिहाय करण्यात आलेली वृक्षलागवड

नांदेड ः १६५४, अर्धापूर ः २०५, मुदखेड ः २६७, कंधार ः १४६६, मुखेड ः १७२४, देगलूर ः ९६२, बिलोली ः ७९६, नायगाव ः ८००, धर्माबाद ः २३७, हदगाव ः १२५०, किनवट ः ६७०, भोकर ः ९१०, हिमायतनगर ः ५२५, माहूर ः १४००, उमरी ः ११२५, लोहा ः १२१०, एकूण ः १५ हजार २०१

वटपौर्णिमेनिमित्त आज मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात वडवृक्ष लागवड करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड करण्याची ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येत आहे.

- वर्षा ठाकूर - घुगे, सीईओ, जिल्हा परिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com