Nanded News | बोचऱ्या थंडीने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Very cold Citizens

नांदेड : बोचऱ्या थंडीने नागरिक त्रस्त

नांदेड : शहरात थंडीचा पारा घसरला असून बोचऱ्या थंडीचे वारे दिवसभर वाहू लागल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. आठवडाभरापासून सातत्याने वातावरणात सतत होणारे बदल अनुभवायला मिळत आहेत. दोन दिवसांपासून नांदेड शहराचे तापमान कमी जास्त होत आहे. त्यामुळे नांदेडकरांची बोचऱ्या थंडीमुळे त्रेधा तिरपिट उडाली आहे. रविवारी (ता.३०) सकाळी नांदेडच्या तापमानाचा पारा घसरलेला असल्यामुळे नागरिक हैराण होते. या थंडीचा पिकांवर विपरित परिणाम दिसून येत आहे.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

नांदेड शहरात थंडीचा विपरित परिणाम दिसून येत आहे. या मुळे पिकांवर देखील परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

गुलाबी थंडीचा आनंद घेत शहरातील चैतन्य नगर, सांगवी, अबचल नगर, गोदावरी घाट तसेच अन्य भागात फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे.

शिवाय पहाटे पिकांवर दवबिंदू साचत असल्याने अनेक ठिकाणच्या पिकांसह फळबागांचे देखील नुकसान होणार आहे. २ वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यातच संसर्गजन्य आजारांना सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून, यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: नाशिक गारठलं! निफाडमध्ये आज तब्बल 6 डिग्री सेल्सियस तापमान

शुक्रवारी तापमान

कमाल : १३.२ डिग्री सेल्सियस

किमान : २६.४ डिग्री सेल्सियस

शनिवारी तापमान

कमाल : १०.६ डिग्री सेल्सियस

किमान : २९.८ डिग्री सेल्सियस

रविवारी तापमान

कमाल : ११ डिग्री सेल्सियस

किमान : २९ डिग्री सेल्सियस

Web Title: Nanded Very Cold Citizens Suffer Resort To Fires

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top