नांदेडमध्ये तलवारींचा साठा जप्त, सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण | Nanded Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swords Seized In Nanded

नांदेडमध्ये तलवारींचा साठा जप्त, सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड : नांदेडमध्ये दुसऱ्यांदा आज रविवारी (ता.आठ) तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. दहा दिवसांमध्ये दुसऱ्या वेळेस तलवारीचा साठा जप्त केला गेला आहे. नांदेड येथील दत्तनगरमधील फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकले असता पोलिसांना दहा तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Swords Seized By Police Team In Nanded, Fear Among People)

काही महिन्यांपूर्वी औरंगाबादेतही तलवारींचा साठा जप्त करण्यात आला होता. कुरिअरने तलवारी औरंगाबाद (Aurangabad) व जालना येथील ग्राहकांनी मागितल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते. नांदेडमध्ये (Nanded) उद्योगपती बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली. मात्र नांदेडमधील गुन्हेगारी कृत्य थांबताना दिसत नाही.

आज पुन्हा एकदा १० तलवारी एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :NandedCrime News