

Nanded News
esakal
नांदेड: जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच जलसंकटाचे गंभीर चित्र समोर आले आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योगांकडे जलसंपदा विभागाची तब्बल ५३१.०८ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याने प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी वसूल होत नसल्याने थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.