नांदेड : जेंव्हा पोपट विकणाऱ्याचाच पोपट होतो तेंव्हा...

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : एखाद्याची टर उडविण्यासठी विविध क्लृप्त्या केल्या जातात. संबंधित व्यक्तीची फजिती झाली की कसा पोपट झाला असे म्हंटले जाते. पण एकाला पोपट विकणे चांगलेच महागात पडले. पोपट विकणाऱ्याचा पोपटच झाला. नांदेड- अर्धापूर रस्त्यावरील आसना पुलाच्या परिसरात पोपट विकणाऱ्यांना वनविभाने कार्यवाही करुन अटक केले आहे. या धडक कारवाईमुळे वन्यजीवाची तस्करी करून विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानून गेले आहेत.

वन्यजीवांची हत्या करणे, विक्री करणे, बाळगणे हा गुन्हा आहे. कायद्याने आशा गैरव्यवहाराला बंदी असून कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. असे असतांना नांदेड- अर्धापूर रस्त्यावर आसना नदीच्या पुलाजवळ एक व्यक्ती पोपटाची विक्री करित असल्याची गुप्त माहिती वन विभाग नांदेड कार्यालयाच्या वनपरिक्षेत्र कार्यालय व केंद्रीय वन्यजीव गुन्हे विभाच्या गुन्हे अन्वेशन विभागाच्या संयुक्त पथकाला मिळआली. यावरुन त्यांनी सापळा रचला. या पथकाने बुधवारी (ता. १६) आसना नदी परिसरात अवैधरित्या पोपट विकणाऱ्या व्यक्तीवर छापा टाकला. त्या व्यक्तीकडे पोपट व पोपटाची पंधरा पिल्ले आढळून आले.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसुची चारमधील प्रकरण पोपट व टोही पोपट प्रमाणे अवैधरित्या पोपटाची विक्री करताना शेख रहिम शेख उस्मान (रा. महेबूबनगर, नांदेड) याला अटक करुन वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपीस अटक करण्यात आल्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे त्या दृष्टीने तापास सुरु आहे.

ही कार्यवाही संयुक्त पथकाने उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी, वनपाल पांडुरंग धोंडगे, ज्ञानेश्वर हक्कदळे, एल. एन. बंडगर, वनरक्षक जी. आर. घुगे, संभाजी घोरबांड, प्रदीप शिंदे, एस.बी. घोडके, बी. पी. काकडे, विद्या वाठोरे, एस. टी. अलोने, वाहनचालक गुलाब जाधव, वनमजूर लोहाळे यांनी केली.


पोपटांनी घेतला मोकळा श्वास..

आकाशात मुक्त भरारी घेवून स्वच्छंदाने वावरणे हे प्रत्येक पक्षाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्वतंत्रपणे व मुक्तपणे संचार हा पक्षांचा स्थायीभाव. पण व्यक्ती आपल्या छंदापायी त्याला बंदिस्त करुन त्यांच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणतो, तर कधी पैशापायी तस्करी करुन विक्री करतो. वनविभागाच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करुन पोपटांना मुक्त संचारासाठी व स्वतंत्र्याचे जीवन जगण्यासाठी सोडून दिले. बंद पिंजराऱ्यात जाण्याअधिच वनविभागाच्या पथकाने मुक्त श्वास घेण्यासाठी सोडून दिल्याने पक्षप्रेमीतून आनंद व्यक्त केला जात आहे.


संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com