नांदेड - ‘नीट’ परिक्षा कधी होईल निट, सावळा गोंधळा कायम  ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना मनस्ताप 

शिवचरण वावळे
Sunday, 13 September 2020

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) परीक्षेची नियमावली कडक आहे. केंद्रीय स्तरावर राबविल्या जाणाऱ्या या परिक्षेत केंद्रस्तरावर ऐनवेळी नव्याने नियमावलीत बदल होतात. त्याचा विद्यार्थ्यांसहित स्थानिक पातळीवरील समन्वक यांना देखील त्याचा चांगलाच मनस्ताप होतो हे तितकेच खरे आहे. नांदेडात देखील रविवारी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान याची प्रचिती दिसून आली.

नांदेड - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी (ता.१३) देशभरात एकाच वेळी घेण्यात आली. जिल्ह्यातील ६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा संपन्न झाली. पुरंतु जेईई प्रमाणेज नीट परिक्षेच्या आदल्या दिवशी परिक्षा केंद्रत बदल आणि परिक्षेच्या काही तास अगोदर कोरोना बाधित विद्यार्थ्यांना परीक्षेला न बसू देण्याच्या निर्णयासोबत जिल्ह्यातील ढिसाळ नियोजनामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांना चांगलाच मस्ताप सहन करावा लागला आहे. 

जिल्ह्यातील ६२ केंद्रावर घेण्यात आलेल्या परिक्षाकेंद्रापैकी शहरातील ३५ केंद्रावर याचा समावेश होता. परंतु ऐनवेळी दोन परीक्षा केंद्रात बदल केल्याने नीटच्या विद्यार्थ्यांना मेल आणि एसएमएसद्वारे बदललेले परीक्षा केंद्राचे नवीन ठिकाणाबद्दलची माहिची वेळेवर न पोहचू शकल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऐनवेळी सेंटर शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. संबंधित विभागाकडून वेळेवर माहिती प्रसिद्धीसाठी दिली गेली नाही. अनेक वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी पाठपुरावा करुन देखील सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. किड्स किंगडम शाळेचे प्राचार्य सुनिल श्रीवास्तव यांच्याशी संध्याकाळी संपर्क साधून जिल्ह्यातील नीट परीक्षेच्या आकडेवारीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. 

हेही वाचा- ऐकावे ते नवलच ! नांदेडकर करतात दिवसाला पाच ट्रक अंडे फस्त ​

किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नेमका आकडा कळू शकला नाही. 

कोरोना बाधित विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेगळी व्यवस्था करण्यासाठीच्या सुचना संबंधित परिक्षा केंद्रावर देण्यात आल्या होत्या. परंतु  शनिवारी (ता.१२) अचानक कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे कोसोदुरुन रात्रभर प्रवास करुन आलेल्या विद्यार्थी व पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आंध्रा समिती शाळेच्या सेंटरवर परिक्षा देण्यासाठी आलेल्या कोरोना बाधित विद्यार्थ्यास वर्गात प्रवेश न दिल्याने विद्यार्थ्यास परतावे लागले. रविवारी परीक्षा संपली तरी, नेमक्या किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या बद्दलचा नेमका आकडा कळू शकला नाही. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, कसा तो वाचा? ​

राज्य परिवहन मंडळ  १५ बसचे नियोजन

विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नांदेड विभागाच्या वतीने १५ बसचे नियोजन करण्यात आले होते. ऐनवेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल असे एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी व आगारप्रमुख यांच्याकडून सांगण्यात आले होते. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - When will the 'Neat' exam be held? Changes in the examination center at the time, annoying the coronated students Nanded News