नांदेड : ‘एसटी’चा संप कधी मिटणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

नांदेड : ‘एसटी’चा संप कधी मिटणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसले तरी देखील कुठलीही कुरबुर न करता चालक - वाहकांनी एसटीची चाके सतत धावती ठेवली होती. मात्र महागाईच्या भस्मासुरामुळे तुटपुंज्या वेतनावर संसाराचा गाडा चालवणे कठीण होऊन बसल्याने मागील १७ दिवसापासून राज्य शासनात विलनीकरणाच्या मुद्यावरुन संप सुरू आहे. त्यामुळे एसटी महामंडळासह प्रवाशांचेही मोठे नुकसान होत असल्याने एसटीचा संप मिटणार कधी? असा प्रश्न सर्वसामान्यांसह प्रवाशी नागरिकांनी उपस्थित केला आहे.

एसटी कर्मचारी संपावर असल्याने नांदेड विभागाचे मागील १७ दिवसांत आठ ते नऊ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ही नांदेड विभागाची अवस्था नाही तर संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांपैकी बहुतेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्याची मागणी मान्य केली गेली नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा न्यायालयीन लढा सुरु झाला आहे. एसटी महामंडळातील विविध पक्षाच्या कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांना कुठल्याही परिस्थितीत विलनीकरण हवे आहे. त्यासाठी विविध पक्ष व संघटनांचा जाहिर पाठिंबा देखील मिळत आहे.

दरम्यान, येथील एसटी कामगार संघटनेच्या वतीने एसटी विलनीकरण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे काही काळ वाहतुकही विस्कळीत झाली होती. मोर्चा काढल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

भाजपने आंदोलन हायजॕक केले

विविध मागण्यांसाठी मागील १७ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भाजपने हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, भाजप एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकेल का? हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. सीटू कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत रविवारी राज्यभरातील आगारावर आंदोलन देखील केले आहे.

भाजप हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना आडून

"राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मांडावेत."

- गंगाधर गायकवाड, सरचिटणीस, सीटू.

loading image
go to top