esakal | नांदेडमध्ये दुचाकीस्वारांनी भरदिवसा महिलेला लुटले, गळ्यातील गंठण लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड शहराच्या गणेशनगर रस्त्यावरील घटना, महिला भयभीत तर दुसऱ्या घटनेत हदगाव येतील शेतकऱ्याला लुटले.

नांदेडमध्ये दुचाकीस्वारांनी भरदिवसा महिलेला लुटले, गळ्यातील गंठण लंपास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासकिय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका गणेशनगर मार्गे पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील तिन तोळे सोन्याचे गंठण अनोळखी दुचाकीस्वारांनी जबरीने तोडून चोरून नेले. हा प्रकार दमकोंडवार यांच्या घरासमोर बुधवारी (ता. २४) सायंकाळी घडला. या प्रकारामुळे महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या उषा अरविंद गायकवाड (वय ५०) ह्या बँकेचे काम करून परत आपल्या घराकडे पायी जात होत्या. त्या शासकिय विश्रामगृह ते गणेशनगर यी जात होत्या. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या एका दुचाकीवरील दोघांनी त्या श्री. दमकोंडवार यांच्या घरासमोर जाताच पाठीमागून दुचाकीजवळ नेऊन त्यांच्या गळ्यातील ९२ हजार रुपये किंमतीचे तिन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरीने तोडून घेऊन सुसाट पसार झाले. अचानक मानेला धक्का लागल्याने त्यांना नेमके काय घडले ते कळलेच नाही. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील गंठण चाचपले असता ते दिसले नाही. त्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. थोडा वेळ तिथेच थांबून त्यांनी आपले घर गाठले. घरी त्यांनी आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. गंठण पळविण्याचा प्रकार हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला असून पोलिस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. उषा गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. सूर्यवंशी करत आहेत. 

हेही वाचाबाळा तुझे वय किती? तू बोलतोस काय? पडळकरांचे टोचले कान, कोणी? ते वाचा...

हदगावमध्ये जबरी चोरी

नांदेड : हदगाव शहरातील आंबेडकर चौकात एका शेतकऱ्याला अडवून त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये जबरीने चोरून नेले. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

डोरली (ता. हदगाव) येथील शेतकरी दादासाहेब मेश्राम शेळके (वय ४६) हे कामानिमित्त हदगावला बुधवारी गेले होते. आपले काम आटोपून ते टी पॉईट आंबेडकर चौक येथे थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ एकजण आला. त्याने त्यांना शिविगाळ करून त्यांच्या खिशातील नगदी पाच हजार रुपये जबरीने काढून घेऊन पळून गेला. या प्रकरणी दादासाहेब मेश्राम शेळके यांच्या फिर्यादीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. विठुबोने करत आहेत.