नांदेडची चिंता वाढली:  गुरुवारी ११७ रुग्णांची भर, चौघांचा मृत्यू, संख्या पोहचली १६८५ वर  

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात गुरुवार (ता. ३०) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ११७ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ५६ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हयातपूरा कंधार, आझाद काॅलनी देगलूर, वजिराबाद आणि नेरली ता. नांदेड येथील बाधीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. 

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ७८ एवढी झाली आहे. यात ७१ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ६५६ अहवालापैकी ४५७ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ६८५ एवढी झाली आहे. यातील ८४६ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ७४९ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या ५६ बाधितांमध्ये डाॅ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातून १९, देगलुर कोवीड सेंटरमधून १३, उमरी कोवीड सेंटरमधून १०, शासगी रुग्णालयातून सहा, मुखेड कोविड सेंटरमधून सात आणि बिलोली कोविड सेंटरमधून एकाचा समावेश आहे.

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील कलामंदीर एक, वाडी नांदेड एक, गौत्तमनगर एक, बालाजीनगर एक, सोमेश काॅलनी एक, शास्त्री नगर एक, चौफाळा एक, गाडीपूरा एक एक, वसंतनगर एक, गोवर्धनघाट एक, गणेशनगर एक, आनंदनगर दोन, मदिनानगर एक, हडको एक, सिडको एक, वसरणी तीन, वाजेगाव एक, हैदरबाग एक, दिलीपसिंग काॅलनी एख, बोरबन वजडिराबाद पाच, कोसरनगर एक, रामभाई काॅम्पलेक्स कौठा एक, जयभीमनगर १५, शिवाजीनगर पाच, नागसेननगर तीन, राजनगर एक, चिखलवाडी तीन, जेतवननगर एक, महाविर सोसायटी एक, हडको एक, देगलुर एक, दापका गंडोपंत एक, रिटा ता. भोकर एक, अर्धापूर एक, सगरोळी दोन,

कोल्हेबोरगाव बिलोली एक, आझाद काॅलनी देगलूर एक, तारेमातकापूर देगलुर एक, नागोबा लाॅजीया सदन मंदीर देगलूर एक, भोईगल्ली भवानी चौक चार, लाईनगल्ली देगलुर पाच, नागोबा मंदीर देगलुर एक, देगलुर शहर दोन, भाविदास चौक देगलुर एक, लक्ष्मीनगर देगलूर एक, प्राथमीक रुग्णालय धर्माबाद एक, हदगाव १३, तामसा दोन, नंद्यान कंधार एक, हातेपूरा कंधार दोन, फुलवळ कंधार तीन, फुलेनगर कंधार एक, पानभोसी कंधार एक, सोनखेड एक, मंग्याळ ता. मुखेड एक, वाल्मीकीनगर मुखेड एक, नायगाव शहर दोन, नर्सी ता. नायगाव एक, कोकलेगाव ता. नायगाव एक, उमरी एक, खुजदा पूर्णा एक, 

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ७४९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २६९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १९, जिल्हा रुग्णालय येथे २५, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १५, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९५, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ३९, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर २७, किनवट कोविड केअर सेंटर येथे दहा, लोहा कोविड केअर सेंटर येथे दोन कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, भोकर तीन, कंधार १३, धर्माबाद २४, खाजगी रुग्णालयात ७२ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित तीन, निझामाबाद एक आणि मुंबई दोन आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

  • सर्वेक्षण- १ लाख ४९ हजार २४२
  • घेतलेले स्वॅब- १३ हजार ७७६
  • निगेटिव्ह स्वॅब- १० हजार ८७६
  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ११७
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १६८५
  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-२२
  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-५६
  • मृत्यू संख्या- ७८
  • रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ८४६
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ७४९
  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २०२  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com