Nanded: पूर्व वैमनस्यातून युवकाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकाची हत्या

नांदेड : पूर्व वैमनस्यातून युवकाची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोविंदनगर भागात पूर्व वैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता.२५) सकाळी घडली. या प्रकरणी एकास विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोविंदनगर भागात राहणारे कृष्णा भगवान गोंदकर यांचा या भागातील नाल्याजवळ अमोल नारायण बुक्तरे यांच्यात वाद झाला. अमोल यांनी जवळ असलेल्या खंजीरने कृष्णा यांच्या पोटात वार केला. यात गंभीर जखमी अवस्थेत असताना उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या प्रकरणी मयताची आई निलाबाई भगवान गोदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी अमोल नारायण बुक्तरे यास विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नरसिंग आनलदास हे करीत आहेत.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सदर प्रकार हा पुर्वी वाढदिवसानिमित्त दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच आनलदास यांनी तत्काळ आरोपीला काही वेळातच अटक केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला व घटनेबाबत परिसरात माहिती घेतली.

loading image
go to top