नांदेड : स्पर्धेत टिकण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटकडे तरुणांनी लक्ष द्यावे- डाॅ. श्रीकांत पाटील

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरुणांनी कौशल्य विकास करण्यासाठी लक्ष घालून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन अर्धापूरात बोलतांना डॉ. श्रीकांत पाटील यांनी तरुणांना केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांनी क्रिप्स डेव्हलपमेंट करण्यासाठी संस्था कार्यवित करुन ही संस्था विदेशाबरोबर देशात कार्य करते. मध्यप्रदेश सरकाराने क्रिप्सला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. 
या संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत पाटील हे मराठवाड्यातील भुमिपूत्र असून त्यांनी कौशल्य विकास क्षेत्रात पीएचडी केली आहे. ते कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रात पदवीधर असून ते अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी असलेले डॉ. श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपण्यामध्ये विविध पदावर कार्य केले आहे. ते अर्धापूर येथे आले आसता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश केला असून त्यांच्या बुध्दीचा फायदा आपल्या भुमिपूत्रानां व्हावा यासाठी आपण विशेष लक्ष ठेऊन आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. 

अर्धापूरातील भाजयुमोचे जिल्हा प्रसिद्धी सखाराम क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ. श्रीकांत पाटील चंद्रवंशी म्हणाले की भविष्यात भारतातील तरुण स्पर्धेत टिकवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना लक्ष देऊन स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन डॉ. श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांनी केले यावेळी जिल्हा चिटणीस योगेश हाळदे, शहराध्यक्ष विलास साबळे, पत्रकार गोविंद टेकाळे, सचिव गुणवंत विरकर, संकेत क्षीरसागर आदी उपस्थितीत होते. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com