esakal | नांदेड आपचे जिल्हाध्यक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मै मै; समाज माध्यमातून व्हिडीओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आपचे जिल्हाध्यक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांत चांगलीच तू तू- मै मै. या दोघांच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी आपच्या जिल्हाध्यक्षांनी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

नांदेड आपचे जिल्हाध्यक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मै मै; समाज माध्यमातून व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यासह राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी व्यस्त असतांना मालेगाव (ता. अर्धापूर जिल्हा नांदेड) येथील जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या आपच्या जिल्हाध्यक्षास वैद्यकीय अधिकाऱ्याने आश्लील शिवीगाळ केल्याची घटना रविवारी (ता. चार) झाली आहे. आपचे जिल्हाध्यक्ष व वैद्यकीय अधिकाऱ्यांत चांगलीच तू तू- मै मै. या दोघांच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी आपच्या जिल्हाध्यक्षांनी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

मालेगाव येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात आपचे जिल्हाध्यक्ष बालाजी आबादार गेले असता या केंद्रातील वैद्यकीय अधिका-या त्यांच्या गैरवतर्तनाबद्दल जाब विचारला असता दोघांत चांगलाच वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर वैद्यकीय अधिका-यांचे आरेराविची भाषा वापरुन चक्क अश्लील शिवीगाळ केली. तसेच माझे कोणीच काही वाकडे करु शकत नाही असे सांगितले.

हेही वाचा - मुलगी बोहल्यावर चढण्याआधी वडिलांचा मृत्यू; माहूर तालुक्यातील हरडफ येथील हृदय हेलावणारी घटना

दरम्यान या दोघात झालेला वाद हा समाज माध्यमातून चांगलाच गाजला आहे. या घटने बाबत दोन्ही बाजुने प्रतिक्रिया येत आहेत. वैद्यकीय यंत्रणेवर कामाचा ताण असला तरी केंद्रात आलेल्या अभ्यांगतांना मानवी वागणूक देवून चांगले बोलने आवश्यक आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व समाज माध्यमातून उमटत आहेत.

या बाबत आपचे अध्यक्ष बालाजी आबादार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी माझे काही एक ऐकून न घेता आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी मी पोलिसात तक्रार केली आहे.
- बालाजी आबादार

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image