नांदेड : पिस्तूलधारी युवकास दोन दिवसांची पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Sunday, 1 November 2020

सोमवारी (ता. एक) नांदेड ग्रामिण पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायाधीश जी. सी. फुलझळके यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे

नांदेड : शहरात विनापरवाना पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका वर्षीय युवकाला दरोडा प्रतिबंधक पथक (एडीएस) ने शनिवारी (ता. ३१) रात्री अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुस जप्त केले. त्याला सोमवारी (ता. एक)नांदेड ग्रामिण पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायाधीश जी. सी. फुलझळके यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.

शहर व जिल्ह्यातील पिस्तुलच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्यांची यादी तयार करुन पोलिसांचे अशा गुन्हेगारावर बारीक लक्ष आहे. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सर्वच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची शहर व जिल्ह्यातील फरार आणि पाहिजे असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी सर्वत्र गस्त सुरु केली. स्थानिक गुन्हे शाखाअंतर्गत चालणारे दराडो प्रतिबंधक पथक (एडीएस) चे पथकप्रमुख फौजदार दशरथ आडे आणि त्यांचे सहकारी जमादार जसपालसिंग कालो, हेमंत कांबळे, राज ठाकरे, श्री. दासरे, श्री. बोधगिरे, किशन मुळे हे रात्री शहरात गस्त घालत होते. 

हेही वाचा -  चोरट्यांचे पोलिसांना आव्हान : भाऊराव चव्हाण कारखान्याच्या कार्यालयासह एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली -

एडीएस पथकाची कारवाई

त्यांचे पथक लातूर फाटा परिसरात रात्री बाराच्याच्या सुमारास आले असता त्यांना तेथे एक संशयास्पद फिरणारा युवक दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने ललित सत्यनारायण शर्मा (वय २४) रा. कौठा (जुना) असे नाव सांगितले. त्याची उलट तपासणी घेतली असता त्याची बोबडी वळली. पोलिसांना त्याच्याबद्दल संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एक विनापरवाना पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस जप्त केले. 

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढ -

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना देऊन पिस्तुलसह आरोपीस नांदेड ग्रामिण पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार दशरथ आडे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरक्षक प्रशंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेख असद करत आहे. ललीत शर्मा याने पिस्तुलचा धाक दाखवून काही गुन्हे केले आहेत का याची चौकशी नांदेड ग्रामीण पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A youth with a pistol has been remanded in police custody for two days nanded news